आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी 6.20 ला उडा; 7.10 ला मुंबईत उतरा; नाशिकच्या विमानसेवेचे वेळापत्रक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- येत्या २३ डिसेंबरपासून नाशिकहून सुरू हाेत असलेल्या विमानसेवेचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले असून, सकाळी वाजून २० मिनिटांनी मुंबईसाठी विमानाेड्डाण हाेईल. अवघ्या ५० मिनिटांत म्हणजे वाजून १० मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर उतरणार असल्याने भल्या सकाळी मुंबईत पाेहाेचण्याबराेबरच इच्छुकांना तेथून देशाच्या अन्य महानगरांत जाणारी सकाळची ‘कनेक्टिंग फ्लाइट‌्स’ पकडणेही शक्य हाेणार अाहे. मुंबईहून परतीचे विमान सायंकाळी वाजून १० मिनिटांनी असेल. जे वाजता नाशकात उतरेल. दरम्यान, पुण्याकरिता सायंकाळी वाजून २० मिनिटांनी ते उड्डाण भरेल अाणि वाजता पाेेहाेचेल अाणि परतीसाठी लगेचच वाजून २० मिनिटांनी निघून वाजता नाशकात उतरेल अशी माहीती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 


एअर डेक्कनची विमानसेवा २३ डिसेंबरपासून सुरू हाेत असून नाशिक (अाेझर) विमानतळावरून अतिशय याेग्य वेळेत ही सेवा िमळणार असल्याने नाशिककरांना मुंबई विमानतळावरून देशातील काेणत्याही माेठ्या शहरांत वेळेत पाेहाेचणे शक्य हाेणार अाहे. १९ अासनी विमानाद्वारे ही सेवा दिली जाणार अाहे. एअर डेक्कनकडून जळगाव, साेलापूर, काेल्हापूर या शहरांकरिताही सेवा दिली जाणार असून पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे अाणि मुंबई-जळगाव अशी परतीची सेवा पुरवली जाणार अाहे. 


अाठवड्याचे सातही दिवस अाणि मार्च महिन्यापर्यंत शाश्वत अशी ही सेवा या शहरांना मिळणार असल्याचे एव्हिएशन मंत्रालयाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार स्पष्ट झाले अाहे मात्र कंपनीकडून स्वत: गुरूवारी वेळापत्रकानुसार जाहीर केले जाणार अाहे. 

 
उद्याेजकांना साेयीची वेळ 
नाशिककरांसाठी मुंबई अाणि पुण्याला जाण्यासाठी अाणि येण्यासाठी अत्यंत साेयीच्या वेळात ही सेवा उपलब्ध झाली अाहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिक-पुणे विमानसेवा सुरू झाल्यास पुण्याचा अायटी उद्याेग नाशिकशी थेट जाेडला जाणार अाहे. यातून ही गुंतवणूक शहरात येण्यास चालना मिळू शकेल. 
- मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा 


देशभरात जाण्यासाठी सेवा लाभदायी 
नाशिकहून मुंबईला सकाळी लवकरच पाेहाेचून देशातील प्रमुख शहरांना जाण्यासाठी विमान मिळविणेकामी ही सेवा अत्यंत लाभदायी ठरणार अाहे. शहराच्या विकासाकरिता अावश्यक असलेल्या या सेवेचा सातत्याने केलेला पाठपुरावा, अांदाेलन अाणि नाशिककरांची साथ यामुळे राज्यात एअर डेक्कन नाशिकमधून पहिले टेकअप करीत असल्याचा अानंद अाहे. 
-हेमंत गाेडसे, खासदार 


मुंबई, पुण्यासाठी याेग्य वेळा, पर्यटनवृद्धीसही फायदा 
दाेन्ही शहरांकरिताच्या वेळा अत्यंत याेग्य असून पर्यटनवृद्धीला पूरक अाहेत. महत्त्वाचे म्हणजे या सेवेमुळे विमानतळावरील कामकाज सुरू हाेणार असून इतर कंपन्याही येथून सेवा देऊ शकतील.
-दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंटस‌् असाेसिएशन, नाशिक 


१४२० रुपये भाडे 
उडाणयाेजनेंतर्गत १४२० रुपये (अधिक कर) प्रति अासनी भाडे यासाठी असेल त्याशिवाय काही भाग्यवंतांना एक रुपयात हा प्रवास करण्याची संधीदेखील मिळणार अाहे. दरम्यान, अाज गुरुवारपासून या विमानसेवेसाठीची तिकीट बुकिंग संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर अाॅनलाइन पद्धतीने उपलब्ध हाेणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...