आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगच्या जागाच अनिश्चित तरीही टाेइंगधाडीची सक्ती; नाशिककरांना काय वाटते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुळात शहरात पार्किंगची स्थळे नेमके किती काेणती याबाबत महापालिकेने काेणतेही ठाेस नियाेजन केले नसताना किंबहुना सध्या अस्तित्वात असलेले पार्किंग वा नाे पार्किंगच्या जागेवरूनही संभ्रम असताना येथील गाड्या उचलण्यासाठी मात्र तत्परता दाखवून टाेइंगचे कंत्राट देण्याची घाई वादाचा विषय ठरली अाहे. यापूर्वी तत्कालीन अायुक्त जगन्नाथ किंबहुना कुलवंतकुमार सरंगल यांनीही या वादग्रस्त विषयाला काही काळापुरता विराम देत ठेकेदारांचे पाेषण करणारी व्यवस्थाच बंद करून ठेवल्याची अाठवणही करून दिली जात अाहे. पार्किंगच्या दुखण्यावर उपाय शाेधण्यासाठी की कमाईची शक्कल लढवणाऱ्या ठेकेदारांसाठी टाेइंगधाडीची सक्ती, असा प्रश्न अाता चर्चेत अाला अाहे. 


रिक्षा उचलण्यासाठी २५ रुपये तर त्यापेक्षाही लहान वाहन असलेल्या दुचाकी उचलण्यासाठी शंभर रुपयांचा दंड अाकारणीबाबत कशा पद्धतीने टाेइंग कंत्राट मिळवण्यासाठी शक्कल लढवली यावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकला. त्यानंतर जागरूक नाशिककरांनी टाेइंग व्यवस्था म्हणजे जणू एक धाडच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत प्रथम पार्किंगची स्थळे काेणती याचा फैसला करा नंतरच अामच्या गाड्या उचलून हवा ताे दंड करा अशी भूमिका मांडली. 


अाजघडीला महात्मा गांधीराेड, रविवार कारंजा, अशाेकस्तंभ, मेहेर, शालिमार, शिवाजीराेड, महापालिका राजीव गांधी भवन, कॅनडा काॅर्नर, काॅलेजराेड, गंगापूरराेड या भागात खासकरून बेशिस्तपणे वाहन लावल्यास टाेइंगचा दट्ट्या बसताे. मात्र, या ठिकाणी महापालिकेने पार्किंगच्या अधिकृत जागा काेणत्या हे निश्चितच केलेले नाही. महात्मा गांधीराेडवर तर एक दिवसाअाड पार्किंगची व्यवस्था असली तरी त्याबाबत सूचना देणारे फारसे फलक नाही. त्यामुळे किरकाेळ कामासाठी येणाऱ्या ग्राहकाला दाेन मिनिटांच्या कामासाठी भुर्दंड बसत अाहे. त्यातही बेशिस्त पार्किंगला अाळा बसवण्यापेक्षा ठेकेदारांच्या पाेषणाच्या दृष्टीनेच ही व्यवस्था अनुकूल असल्याचे बघून अाधी वाहनतळे निश्चित करा त्यानंतर वाहने टाेइंग करा, अशी मागणी जाेर धरत अाहे. 


एका चकरेत मिळतात बाराशे रुपये 
वाहतुकशाखेचे कार्यालय असलेल्या जुन्या पाेलस अायुक्तालयाच्या जागेपासून टाेइंग वाहन निघते अाणि फारतर अर्धा-एक किलाेमीटर अंतरावर त्यांना रस्त्यालगत पाहिजे तितक्या गाड्यांची सहज शिकार मिळते. एका गाडीत साधारण १२ वाहने मिळतात. जुन्या दराप्रमाणे प्रतिवाहन ७० रुपये भाडे याप्रमाणे हिशेब केला तर, साधारण एका चकरेत ८४० रुपये मिळतात. नवीन दरानुसार १२०० रुपये मिळू शकतील. दुसरीकडे चारचाकी उचलण्यासाठी इतकेच इंधन खर्च करताना त्यापेक्षा निम्मीही रक्कम मिळत नसल्यामुळे किंबहुना त्यासाठी शक्ती वेळ अधिक खर्ची पडत असल्यामुळे दुचाकीचेच चांगभले असा मंत्र ठेकेदारांकडून जपला जात असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त हाेत अाहे. 


वाहनचालकांनी रस्त्यावर वाहने लावल्यास त्यांच्यावर कारवाई करून दंडवसुलीबाबत दुमत नाही. मात्र, तत्पूर्वी शहरातील पार्किंगची ठिकाणे निश्चित व्हायला हवीत तसेच त्या त्या ठिकाणी दर्शनी भागात तशी माहिती देणारे फलक लावले जावेत. याशिवाय वर्षानुवर्षे कागदावर असणाऱ्या बहुमजली पार्किंग वा तत्सम अन्य सुविधा महापालिकेने प्रथम याेग्य त्या प्रमाणात तातडीने उपलब्ध करून द्यायला हव्यात. तूर्त रस्त्यावर लावलेली वाहने ‘उचलण्या’च्या नावाखाली संबंधितांकडून जी अरेरावी अाणि दंडेली केली जाते त्याला अाळा बसणे अावश्यक अाहे. जागच्या जागी संबंधित वाहनचालक दंड भरण्यास तयार असेल तर तेवढा दंड अाकारून त्याला त्याचे वाहन तेथेच परत केले जावे. असे झाल्यास ठिकठिकाणी उडणारे खटके कमी हाेतील. 


शहरात नाे पार्किंग क्षेत्रात दुचाकीपासून तर माेठ्या वाहनांना उचलणारी टाेइंग व्यवस्था असावी का? असल्यास त्याचे स्वरूप कसे असावे, पारदर्शकतेच्या दृष्टीने त्याच्या दरापासून तर अन्य सुविधांपर्यंत कशाचा अंतर्भाव असावा, टाेइंग कर्मचाऱ्यांची वर्तणूक त्यावर नियंत्रण, पार्किंगची स्थळे निश्चित झाल्यानंतरच ही व्यवस्था सुरू करावी का याबाबत नाशिककरांना नेमके काय वाटते हे ‘दिव्य मराठी’ला तुम्ही ९०२८७०१९७३८७९६४४९७७९ याक्रमांकावर व्हाॅट्सअॅपद्वारे लेखी कळवावे.

 
दुचाकीपेक्षा माेठे दुखणे चारचाकी वाहनांचे असले तरी, या वाहनांना मात्र टाेइंग कर्मचारी हात लावण्यास तयार नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे, अशी वाहने उचलण्याची त्यांच्याकडे याेग्य स्वरूपाची यंत्रणा नाही. यापूर्वी पारंपरिक टाेइंग व्हेइकलने चारचाकी उचलताना नुकसान अधिक हाेत हाेते. ठेक्यात वाहनांच्या नुकसानीला ठेकेदाराचे कर्मचारी जबाबदार असल्याच्या अटीमुळे वाद वाढत हाेते. 


कधी वाहनचालक अाधीचेच दुखणे ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यावर फाेडून सुटका करीत हाेता. या गडबडीत चारचाकी टाेइंगची यंत्रणाच बंद करण्यात अाली. मुळात दुचाकीपेक्षा माेठी अडचण चारचाकी वाहनांची अाहे. शहरात अाजघडीला रस्ता इमारत यांच्यातील सामासिक अंतरात दुचाकी बसून जाते मात्र चारचाकी लावणे अवघड असते. मात्र, अवघड दुखणे साेडून दुचाकीसारख्या स्वस्त अाणि कमी खर्चात सुविधा देणारी व्यवस्था म्हणून कमाईसाठी बघितले जात असल्याची कैफियत मांडली जात अाहे. दरम्यान, नवीन ठेक्यात चारचाकी टाेइंगसाठी हायड्राेलिक टाेइंग व्हेईकल सक्तीचे केले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...