आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारभावापेक्षा चारपट किंमत माेजत पालिकेचा कचरापेटी घाेटाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कचराकुंडीमुक्त नाशिकला हरताळ फासत कचराकुंडीयुक्त नाशिक करताना महापालिकेने खरेदी केलेल्या १८९ कचरापेट्यात लाखाे रुपयांचा घाेटाळा झाला असून अडीच ते तीन हजार किंमतीच्या कचरापेट्या चक्क ११ हजार १२१ रुपयांना खरेदी करण्याचा बार उडवल्याचा अाराेप विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी केला. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिवसेना अाक्रमक हाेईल असा इशारा बाेरस्ते यांच्यासह गटनेते विलास शिंदे यांनी दिला. 


माजी महापाैर प्रकाश मते यांच्या काळात कचराकुंडीमुक्त नाशिक संकल्पना सुरू करून अादर्श घंटागाडी याेजना सुरू झाली मात्र स्वच्छ भारत अभियानात शहरात कचऱ्याचे एक कपटेही पडणार नाही या उद्देशातून तसेच ओला सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाच्या नावाखाली १८९ ठिकाणी कचरापेट्यांची खरेदी करण्यात अाली. मात्र या खरेदीत महापालीकेच्या अाराेग्य विभागाने हात अाेले करून घेतल्याचा बाेरस्ते यांचा अाराेप अाहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकी ५५ लिटर क्षमता असलेल्या कचरापेटीचे लोखंडी स्टॅण्डसहीत जेमतेम १८ किलो वजन आहे. 


बाजारभावानुसार एका नगामागे अडीच ते तीन हजार रुपये खर्च येणे अपेक्षित असताना ११ हजार १२१ रुपये मोजले आहेत. मुळात कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कमी करणे अपेक्षित असताना सत्तारूढ भाजपने डस्टबीनच्या माध्यमातून शहरात पुन्हा कचराकुंड्या निर्माण केल्याचा अाराेप बाेरस्ते यांनी केला. या डस्टबीनमधील कचऱ्याचे संकलन कसे होणार, याविषयीची कुठलीही योजना प्रशासनाकडे नसल्यामुळे ही खरेदी म्हणजे, रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच आहे. या खरेदीची महापौर आयुक्तांनी चाैकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. 


या घाेटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी बाेरस्ते यांनी अाराेग्यधिकारी डाॅ सुनील बुकाणे यांच्याकडून माहिती मागवली. त्यावर ठाेस माहिती देता बुकाणे यांनी ठेकेदारालाच बाेरस्ते यांच्या कृतीबाबत माहिती दिल्याचा संशय अाहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्याची प्रचिती म्हणजे पत्रकार परिषद सुरू असताना बाेरस्तेंना ठेकेदाराचाच फाेन अाल्यातून दिसली. साहित्य क्षेत्राशी संबधित उद्याेगी ठेकेदाराकडून संबधित पत्रकार परिषद घेऊ नये, अशी याचना केली. मात्र बाेरस्तंनी थांबता संबधित ठेेकेदाराची याचना धुडकावत गाैप्यस्फाेट केलाच. 

बातम्या आणखी आहेत...