आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात गीतांजली जेम्स, चौकसीशी संबंधित तीन ज्वेलर्सवर ईडीचे छापे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील कॅनडा काॅर्नर, गंगापूरनाका तसेच भाेसला सैनिकी महाविद्यालयाजवळील  एक अशा तीन ज्वेलर्सवर मुंबई येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने (ईडी) बुधवारी (दि. २१) छापे टाकले. नीरव माेदी अाणि मेहुल चौकसीच्या ‘गीतांजली जेम्स’शी संबंधित असल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात अाले असून, तब्बल अाठ तासांहून अधिक काळ यातील दाेन ज्वेलर्सकडे वेगवेगळ्या पथकाने कसून चाैकशी केली. याबाबत अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला असला तरी ईडीचे पथक असल्याचे सांगण्यात अाले.  


नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) ११ हजार ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस येताच देशभरात खळबळ उडाली असून, बँकेच्या व्यवस्थापनाने सीबीअाय अाणि ईडीकडे तक्रार करताच गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. या पार्श्वभूमीवरच ईडीकडून माेदी अाणि चौकसीच्या देशभरातील मालमत्ता जप्ती करण्यासाठी छापेसत्र सुरू केले अाहे. ईडीने गीतांजली जेम्स अाणि चौकसीच्या देशभरातील फ्रँचाईसींची तपासणी सुरू केली अाहे. विशेष म्हणजे, ज्या सराफांकडे हिऱ्यांचे दागिने खरेदी-विक्री केली जाते असेच ज्वेलर्स यंत्रणेच्या रडारवर अाहेत. नाशकातही संशयित तिघा ज्वेलर्सच्या संचालकांची चाैकशी करीत त्यांच्याकडे नीरव माेदीच्या कंपनीशी केलेले करारपत्र तपासण्यात अाले. त्यासंबंधीच्या दस्तावेजाची मागणी करण्यात अाली. तसेच हिरे, दागिन्यांचीही तपासणीही केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तीनही ठिकाणी स्वतंत्र पथकाने सकाळी ११ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत चाैकशी सुरू ठेवली हाेती. या कारवाईने सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...