आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पुरस्कार नव्हे हा तात्यांचा अाशीर्वाद’; गाेदावरी गाैरव पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचा सुर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पुरस्कार अनेक मिळत असतात पण, कुसुमाग्रजांच्या नावे, त्यांच्या संस्थेच्या नावे पुरस्कार मिळावा हे अनेकांचं स्वप्न असताे कारण ताे पुरस्कार नसताे तर ताे तात्यांकडून मिळालेला अाशीर्वाद समजला जाताे, प्रसाद समजा जाताे असा सूर गाेदावरी गाैरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने विविध क्षेत्रांत उत्तुंग काम करणा ऱ्या मान्यवरांना अत्यंत दिमाखदार साेहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते गाैरविण्यात अाले. यावेळी प्रत्येक पुरस्कारार्थीचा कार्यगाैरव अधाेरेखित करणारी कुसुमाग्रजांची एक कविता प्रत्येकाच्या पुरस्कारापूर्वी गायल्याने कार्यक्रमात रंगत अाली हाेती.  

 

अाम्ही जिथे काम करताे त्या अादिवासी संस्कृीत अाम्हला बेटी बचाव बेटी पढाव असे उपक्रम राबवावे लागत नाही. त्यांची संस्कृती अाजही स्त्रीप्रधान अाहे. मुलीसाठी वाट बघणारी माणसं अाहेत ती. अत्यंत गरिबितही अतिथी देवाे भव: अाजही तिथे बघायला मिळातं शहरात असं हाेत नाही. तिथे वृद्धाश्रम, अानाथाश्रम नाही. कुमारीमातेला अात्महत्या करावी लागत नाही. पण तिथे कुपाेषण अाहे. त्यासाठी लढताे अाहाेत. अाजही कुपाेषित बालकाचा मृत्यू झाला तर ती अाई म्हणते की, दुसरं एखादं मुल गेलं असतं तर चाललं असतं पण, हे नव्हतं जायला हवं. कुपाेषित बालक त्या कुटुंबाचा अाधार हाेताे. कारण त्या बालकामुळे त्या कुटुंबाला धान्य मिळत असतं. अाईला पुरेसं खायला मिळत असतं.

 

विभाग : लाेकसेवा
मान्यवर : डाॅ. रवींद्र काेल्हे, स्मिता काेल्हे
कविता : प्रकाश दाता जीवन दाता

- स्मिता काेल्हे

 

पाेलिसांवर विश्वास ठेवायला हवा. अपघात झाला, काेणी बेवारस पडलेला असता, साधा अापल्याला कुठला पत्ता हवा असेल तरी अापण पटकन पाेलिसाला विचारताे. अापल्याला माहिती असतं की ताे खाेटं बाेलणार नाही. असाच पाेलिसांवर विश्वास ठेवायला हवा. पाेलिसच नाही तर संरक्षण करणाऱ्या प्रत्येक विभागात अशी खूप माणसं अाहेत त्यांना मनापासून स्विकारा, त्यांना वेळेतच प्राेत्साहन द्या. तेव्हा त्यांची काम करण्याची उर्मी वाढते. अन्यथा खच्चिकरण हाेतं. मी जे कमला मिलमध्ये लाेकांना वाचविण्याचं साहस केलं ते मला काेणी सांगितलं नव्हतं. मला वाटलं मी केलं. अापल्या मनाला वाटेल ते, समाधान देईल ते चांगलं काम केलं की समाज अापाेअाप स्वीकारताेच. 

 

विभाग : साहस
मान्यवर : सुदर्शन शिंदे, महेश साबळे
कविता : माझ्या मराठी मातीचा...

 - सुदर्शन शिंदे

 

पुरस्कार काेणाच्या नावाने अाणि काेण देतं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जुन्या अाणि नव्याची ती सांगड घातलेली असते. काेणतेही पुरस्कार हे उंचीने नाही तर बाैद्धिक उंचीने मिळत असतात. कुसुमाग्रजांनी शिकवलं अाहे की, संस्कृती ही समाज धारणा, दिव्य शक्तीचा अाधार, उच्च विचार यावर अाधारित असते. संस्कृती म्हणजे नैतीक अाणि व्यवहारावर अाधारलेला वृक्ष. हीच संस्कृती अापण पुढे नेताे अाहाेत विविध क्षेत्रांच्या माध्यमातून. मी शिक्षणाच्या उच्च पदावर जेव्हा विराजमान झाले तेव्हा मला असं वाटायला लागलं की माणुसकीचं शिक्षणंही असावं. विद्यार्थ्याच्या नावापुढे वडिलांबराेबर अाईचेही नाव असावे हे प्रयत्न केल्यावर प्रथम अपयश अाले पण नंतर माेठ्या लाेकांनीच बळ दिलं. 

 

विभाग : ज्ञान
मान्यवर : डाॅ. स्नेहलता देशमुख
कविता : नाैका या युगयात्रेस निघाल्या

- डाॅ. स्नेहलता देशमुख

 

मी अाजवर माझ्या अनेक चित्रांची प्रदर्शनं केली. त्या प्रदर्शनांमागे अाधार हाेता ताे कुसुमाग्रजांचा. ते माझ्या प्रदर्शनांना अावर्जून अालेच असे नाही. काही कारणांनी त्यांना यायला नाही मिळाले पण, त्यांचे प्रत्येक प्रदर्शनावेळी अाधी पत्र येत असते. ते प्रत्येक पत्र म्हणजे मला अाधार वाटत असे. त्यामुळे अनेक पारिताेषिकं पुरस्कार मिळाले असतील. पण, हा पुरस्कार वेगळा अाहे. तात्यांची एक शब्दशैली हाेती. त्यातून पाेट्रेट तयार हाेत असे अाणि अाम्ही तेव्हाही विद्यार्थी हाेताे अाणि अाजही त्या शब्दांपुढे विद्यार्थीच अाहाेत. तात्यांमुळेच  मी नाशिकच्या फार जवळ अालाे. चित्रकलेला पुरस्कार वगैरे देणं हे सांस्कृतिकतेत बसत नाही. तरी तात्यांच्या नावचा पुरस्कार मला मिळाला हा अाशीर्वादच

 

विभाग : चित्रकला
मान्यवर : सुभाष अवचट
कविता : अस्त रवीची एक पाकळी

-  सुभाष अवचट

बातम्या आणखी आहेत...