आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई डायव्हिंगमध्ये नाशिकच्या सिध्दार्थला सुवर्ण; स्पर्धेत देशाला सहा पदके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंडाेनेशियातील जकार्ता येथील अाशियाई डायव्हिंग स्पर्धेत एकलहरेच्या सिद्धार्थ बजरंग परदेशी याने १० मीटर बोर्ड प्रकारात सुवर्णपदक तर सिंक्रोनाईज्डमध्येही त्याच्या संघाला कांस्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशाला मिळालेले हे एकमेव सुवर्णपदक ठरले असून एकूण मिळालेल्या सहा पदकांमध्ये राैप्य अाणि कांस्यपदके अाहेत. अाशियाई स्तरावरील स्पर्धेत गत तीन महिन्यांत दुसऱ्यांदासुवर्णकमाई करुन सिध्दार्थने डायव्हिंगमधील काैशल्यसिध्द केले अाहे. 


उझबेकीस्तानलातिहेरी सुवर्ण 
या आधी उझबेकिस्तानमध्ये एशियन एज ग्रुप डायव्हिंग स्पर्धेत सिध्दार्थने तीन सुवर्णपदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती. मीटर स्प्रिंग बोर्ड, मीटर सिंक्रोनाइज्ड स्प्रिंगबोर्ड आणि १० मीटर सिंक्रोनाइज्ड प्लॅटफॉर्म प्रकारात त्याने ही पदके मिळविली. ऑक्टोबर २०१६ मध्ये श्रीलंकेत साउथ एशियन स्पर्धेत त्याने एक सुवर्ण दोन रौप्य तर जपानला नोव्हेंबर २०१६ मध्ये एशियन चॅम्पियनशीपमध्ये सहावे स्थान प्राप्त केले होते. 


पुणे विद्यापीठाचा पुरस्कार 
२०१६ मध्ये आखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सिध्दार्थने तीन सुवर्ण मिळविली होती. त्यामुळे विद्यापीठाने ‘खाशाबा जाधव सर्वोत्कृष्ट खेळाडू’ चा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला होता. सिद्धार्थ नाशिकच्या हिरे महाविद्यालयाचा विद्यार्थी अाहे. 

बातम्या आणखी आहेत...