आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय अांतरविद्यापीठ स्पर्धेत संजीवनीचे विक्रमासह सुवर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अांध्र प्रदेशातील विजयवाडा येथे ७८ व्या अखिल भारतीय अांतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अापलाच मागील विक्रम माेडीत काढून नवीन विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्याच किसन तडवीने ५००० मीटरच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. 


संजीवनीने सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून खेळताना ही कामगिरी नोंदविली. संजीवनीने अवघ्या १५ मिनिटे ५१ सेकंद ५८ शतांश सेकंदाची वेळ नोंदविली. यापूर्वीचा तिचा वैयक्तिक विक्रम हा १५ मिनिटे ५९ सेकंदांचा हाेता. द्वितीय क्रमांकावर अालेल्या कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या वर्षा देवी हिने १६ मिनिटे ५० सेकंद तर दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाच्या डिंपल सिंगने १६ मिनिटे ४६ सेकंदांचा वेळ घेत तृतीय क्रमांक पटकावला.


दुसऱ्या स्पर्धेत किसनने १४ मिनिटे ३९ सेकंद ५६ शतांश सेकंदसह द्वितीय क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत अगदी अखेरच्या क्षणी त्याचे सुवर्ण हुकले. प्रथम क्रमांक पटकावलेला पंजाब विद्यापीठाच्या रणजितकुमारने ही शर्यत १४ मिनिटे ३९ सेकंद १९ शतांश सेकंदासह पूर्ण केली. तर तृतीय क्रमांकावरील पंजाब विद्यापीठाच्या विष्णू वीरसिंग याने १४ मिनिटे ३९ सेकंद ८३ शतांश सेकंदाची वेळ नोंदविली. 

बातम्या आणखी आहेत...