आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबाेल; नेते जिल्हा काढणार पिंजून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी जनजागृती करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान नाशिकमध्ये धडकणार असून, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम सरकारविराेधात हल्लाबाेल हाेणार अाहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये हल्लाबाेल यात्रा यशस्वी करण्याबराेबरच अागामी निवडणुकीसाठी जाेरदार शक्तिप्रदर्शनाची धडपड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरू झाली अाहे. 


राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या सत्ताधारी पक्षाविराेधात हल्लाबाेल यात्रा सुरू अाहे. नाशिक जिल्ह्यातील त्याचाच पुढील भाग रंजक ठरणार अाहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा सध्या कमी झाला असला तरी, एकेकाळी याच जिल्ह्यातून पक्षाचे नेते शरद पवार यांना हात दिला गेला हाेता. छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असताना ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव अधिक हाेता. 


गत लाेकसभा निवडणुकीत भुजबळ यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीची पडझड झाली असली तरी, जिल्हा परिषदेत १८ सदस्य निवडून अाल्यामुळे काही प्रमाणात अाव्हान कायम हाेते. एकेकाळचा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीसाठी हल्लाबाेल यात्रा अत्यंत महत्त्वाची अाहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या सूक्ष्म नियाेजन करून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली अाहे. 


१० मार्चला शरद पवारांची सभा 
हल्लाबाेल यात्रा १६ फेब्रुवारी रोजी येवला येथे येणार असून, या ठिकाणी सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते येवल्यात मुक्काम ठाेकतील. शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता निफाड येथे तर दुपारी २ वाजता दिंडोरी येथे सभा हाेईल. कळवण येथे सायंकाळी ५ वाजता सभा होणार असून त्यानंतर सप्तशंृगगड येथे मुक्काम असेल. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी हल्लाबोल मोर्चा सटाणा येथे होणार असून येथे जाहीर सभेद्वारे पक्षाकडून रणशिंग फुंकले जाईल. जिल्ह्यातील यात्रेचा समारोप होऊन उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याकडे कूच केले जाईल. उत्तर महाराष्ट्रातील दाैऱ्याची सांगता १० मार्च २०१८ रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या जाहीर सभेतून हाेईल. 


जनसामान्यांचा अाक्राेश मांडणार 
केंद्र व राज्यातील भाजप सरकारविराेधात जनसामन्यांचा अाक्राेश वाढला अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ त्याला वाचा फाेडली जाईल. सरकारविराेधातील हल्लाबाेल माेर्चासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्त सज्ज झाले अाहेत.

- जयवंत जाधव, अामदार, राष्ट्रवादी काँग्रेस 

बातम्या आणखी आहेत...