आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचएएलमध्ये हाेणार 5व्या पिढीतील लढाऊ विमानांसह हेलिकाॅप्टरची बांधणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारताने रशिया समवेत केलेल्या करारानुसार पाचव्या पिढीतील ज्या लढाऊ विमानांची बांधणी करायची अाहे, ती अाेझरच्या एचएएलमध्येच केली जाईल. त्याचबराेबर ‘सुखाेई-३० एमकेअाय’वर ब्रह्माेस हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र बसविण्याचे ते साेडण्याचे तंत्रज्ञानदेखील नाशिक एचएएलनेच तयार केले अाहे, त्याची चाचणीही यशस्वी झाली अाहे. अशी ४० सुखाेई विमाने अजून अापल्या हवाईदलात गरजेची अाहेत. त्याचे कामदेखील येथेच हाेणार अाहे. त्याचबराेबर केंद्र सरकारने एचएएलला ‘तेजस ८३’ विमानांचे काम िदले अाहे, ते बंगळुरू अाणि नाशिकमध्ये शेअरिंग बेसिसवर करावे, अशा सूचना मी दिलेल्या अाहेत. त्यामुळे पुढील ३० वर्षे पुरेल इतके काम नाशिक एचएएलकडे असेल, अशी ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी शनिवारी येथे दिली. 


‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत एचएएलचे व्हेंडर असलेल्या मेसर्स डायनॅमेटिक टेक्नाॅलाॅजीज लिमिटेड या कंपनीने ‘सुखाेई’ विमानांची शंभरावी अॅसेंब्ली एचएएलकडे सुपूर्द केली. अाेझर टाऊनशिप येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी डाॅ. भामरे बाेलत हाेते. 


सुखाेईकरिता शंभरावी अॅसेंब्ली एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू यांच्याकडे सुपूर्द करताना बंगळुरूच्या डायनॅमिक टेक्नाेलाॅजीज लिमिटेडचे सीईअाे उदयंत मल्हाेत्रा. समवेत संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे. 

बातम्या आणखी आहेत...