आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या परीक्षेत नववीचे 20 गुणांचे प्रश्न, करावा लागेल गणिताचा अभ्यास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आता घोकंपट्टी न करता कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर जुन्या अभ्यासक्रमाचे स्वरुप हे ‘पुढे पाठ, मागे सपाट’ अशा पद्धतीचे होते. त्यातही बदल करण्यात आला असून दहावीचा अभ्यासक्रम हा नववीच्या अभ्यासक्रमाचे विस्तारित रुप राहणार आहे. 


गणित विषयात नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित २० गुणांचे प्रश्न असतील. मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांमध्येही व्याकरणावर आधारित १२ ते १४ गुणांचे प्रश्न हे पाचवी ते नववीच्या अभ्याक्रमावर अाधारित असतील. राष्ट्रीय करिक्युलम फोरम व राज्य करिक्युलम फोरम यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. देशपातळीवर दहावीच्या अभ्यासक्रमात समानता आणण्याच्या उद्देशाने हा नवीन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)च्या वतीने इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. ज्ञानरचनावाद या रचनेवर आधारलेला नवीन अभ्यासक्रम असून त्यात कृतीतून शिक्षणाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ घोकंपट्टी, पाठांतर न करता कृतीयुक्त अध्ययन करावे लागणार आहे.  

 

गणित विषयासाठी नववीपासूनच करावा लागेल कसून अभ्यास

आता मागील इयत्तेचा अभ्यासही महत्त्वाचा  

विद्यार्थी पुढच्या वर्गात गेल्यावर मागील इयत्तेचा अभ्यासक्रम विसरतो. परंतु आता असे होणार नाही. गणितात भाग एक व दोनमध्ये १६ गुणांचे नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील. पहिल्या प्रश्नातील ‘अ’ व ‘ब’ हे नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यात त्रिकोणमितीचे सूत्र, रेषीय समीकरण आदी प्रकारचे प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांना प्रत्येकी एक गुण असेल. तसेच प्रश्न क्रमांक तीनमध्ये उपक्रमांवर बेस प्रश्न असतील. तर मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांचे व्याकरण इयत्ता नववीतील असेल, तर अन्य विषयांचे स्वरूपही नववीच्या अभ्यासक्रमाचे विस्तारित रुप असेल.  

 

कृतियुक्त शिक्षण  
नवीन अभ्यासक्रमात आता दहावीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचा धडा वाचल्यानंतर, त्यातून तुम्हाला काय संदेश मिळाला, त्याबद्दलचे तुमचे मत सांगा, त्याचे महत्त्व तुमच्या शब्दांत मांडा, तुम्ही केलेली निरीक्षणे नोंदवा...अशा स्वरूपाचे प्रश्न प्रत्येक प्रकरणाखाली विचारले जातील. 

बातम्या आणखी आहेत...