आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिक्ष केंद्रावर का गेला होता म्‍हणत युकाशी वाद;भांडण सोडवण्‍यासाठी गेलेल्‍या दोघांचे डोके फोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- परिक्षा केंद्रावर का फिरत होता, कुणासाठी तेथे गेला होता असे म्‍हणत यावल तालूक्‍यातील दहिगाव येथील ग्रामपंचायती समोर तीघांनी एकाशी वाद घातला तर भांडण सोडवण्यास गेलेल्या दोघांना जबर मारहाण करीत डोके फोडले. घटनेनंतर जखमींसह गावातील नागरीकांनी यावल पोलिस ठाण्यात गर्दी केली व संबधीता विरूध्द गुन्हा दाखल करण्‍याची मागणी केली. 


सचिन भरत बाविस्कर रा. दहिगाव यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते शेतातुन दहिगावात परतले असता ग्रामपंचायत चौकात विशाल कमलाकर भालेराव यास गावातील काही जण मारहाण करीत असल्‍याचे त्‍यांना दिसले.  तेव्हा ते व अमोल दिलीप अडकमोल हे दोघे भांडण सोडवण्याकरीता गेले तेव्हा गावातीलच भगवान राजेंद्र पाटील याने त्याच्या हातातील कपाशी उपरण्याचा लोंखडी चिमट्याने अमोल भालेराव व सचिन बाविस्कर यांना मारहान केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. वाद वाढल्याचे पाहुन गावातील नागरीकांनी जखमी अवस्थेत तिघांना तात्काळ यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. तर वाद अधिक वाढु नये या करीता रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुकाध्यक्ष अरूण गजरे, दहिगावचे किशोर पाटील नागरीकांना शांत केले तर या प्रकरणी भगवान राजेंद्र पाटील, शेनफडू दोधू पाटील व दिलीप दोधु पाटील तीघ राहणार दहिगाव यांच्या विरूध्द जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक एम. जे. मोरे, हवालदार पांडूरंग सपकाळे करीत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जखमींचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...