आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईने पिचलेल्या नाशिककरांवर पालिकेकडून करवाढीचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्पष्ट बहुमताद्वारे सत्तेत अालेल्या भाजपकडून अखेर नाशिककरांना १८ टक्के घरपट्टीत तर ५ टक्के पाणीपट्टीत वाढीची भेट पुढील अर्थिक वर्षापासून दिली जाणार अाहे. करवाढीवरून प्रचंड वाद अाेढवून घेणाऱ्या स्थायी समितीने २० फेब्रुवारी राेजी हाेणाऱ्या महासभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला अाहे. मागील महासभेत, महापाालिका क्षेत्रातील नवीन मिळकतींच्या घरपट्टीत ४० टक्क्यांपर्यंत वाढीच्या प्रस्तावाला भाजपने मंजुरी दिली असताना अाता जुन्याही मिळकती करवाढीच्या तडाख्यात सापडणार असल्यामुळे महागाईने पिचलेल्या नाशिककरांवर 'बुरे दिन' म्हणण्याची वेळ येणार अाहे. 


महापालिकेची अार्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाकडून नानाविध उपाय केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून घरपट्टी व पाणीपट्टीत वाढीचा प्रस्ताव गेल्या दाेन वर्षापासून मंजुरीचा प्रयत्न अाहे. मात्र प्रथम थकबाकी व कर वसुतीतील गळती थांबवा अाणि त्यानंतरच प्रामाणीक करदात्यांवर वाढ लादा अशी मागणी करीत विराेधकांसह नाशिककर सामाजीक संघटनांनी निर्दशनेही केली हाेती. त्याचा दबाव लक्षात घेत स्थायी समितीने करवाढीचा प्रस्ताव मंजुर करण्याबाबत अास्ते कदम घेतले मात्र स्थायी समितीची मुदत संपत असल्याचे लक्षात घेत करवाढिचा प्रस्ताव मंजुर करीत अाता महासभेकडे पाठवला अाहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला करवाढीच्यामुद्यावरून टिकेला सामाेरे जावे लागण्याची शक्यता अाहे.  


अशी अाहे करवाढ 
घरपट्टीतील सर्वसाधारण कराच्या प्रत्येक टप्प्यात ५ टक्के तसेच सर्वसाधारण स्वच्छता कर ३ टक्के, जललाभ कर व पथकरात प्रत्येकी २ टक्के, मनपा शिक्षण करात १ टक्का तर मलनिस्सारण लाभकरात पाच टक्के याप्रमाणे एकूण १८ टक्के दरवाढ प्रस्तावित आहे. प्रस्ताव मंजूर झाला तर महापालिकेला प्रतिवर्षी १२ काेटी ६० लाख रुपयांची वाढ अपेक्षित अाहे. पाणीपट्टीत त्रैवार्षिक वाढ प्रस्तावित असून घरगुती वापराचे प्रति हजारी पाणीदर ५ रुपयांवरून ११ रुपये, बिगर घरगुती २२ रुपयांवरून २९ रुपये तर व्यावसायिक वापराचे पाणीदर २७ रुपयांवरून ३४ रुपयांपर्यंत वाढीचा प्रस्ताव आहे. नळ जाेडणी देताना आकारल्या जाणाऱ्या रस्ता दुरुस्ती शुल्कातही मोठी वाढ प्रस्तावित आहे. कच्च्या रोडकरिता प्रति चौ. मी. दर ८०० वरून १२८०, डांबरी रोड १२०० वरून १९२० तर कॉँक्रीट रोड दुरुस्ती शुल्कापोटी प्रति चौ. मीटर दर २२०० वरून ३५२० रुपये दर प्रस्तावित आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा महागणार असून एक हजार लिटर पिण्याच्या पाण्यासाठी प्रति खेपेचे दर १०० वरून २०० रुपये, चार हजार लिटर पाण्यासाठी २७५ वरून ४५० रुपये, ६ हजार लिटरकरिता ६५० रुपये, ८ हजार लिटरकरिता ४०० वरून ७५० रुपये, तर दहा हजार लिटर पाण्यासाठी १०५० रुपये दर आकारले जातील. 


भाजपला छेद देत मुंढे करवाढीसाठी हाेतील अाक्रमक 
गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी नवनिर्वाचित अायुक्त तुकाराम मुंढे हे अाक्रमक हाेण्याची शक्यता अाहे. सत्ताधारी भाजपला छेद देत हा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाकडून दबाव येण्याची शक्यता असून मुंढे यांची कार्यपद्धती बघता विराेधक करवाढीसाठी कशा पद्धतीने विराेध करतात की ताेंडदेखला विराेध करून अाैपचारिकता पूर्ण करतात याकडे लक्ष लागले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...