आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट, मालिकांत बाल कलाकारांना काम देण्याचे अमिष; तोतया महिला ठग अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चित्रपटात काम करण्याचे अमिष देत मुलींना तब्बल 40 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार ताजा असतांना आत एक महिलेने ‘लेडीज फेसबुक’ ग्रुपवर संदेश पाठवत चित्रपट, टीव्ही मालिकेत संधी देण्यासाठी लहान मुले-मुलींचे फोटो शुट करण्याचे अमिष देत हजारोंचा गंडा घातल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिल्लीच्या एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.

 

 

याप्रकरणी गंगापुररोड येथील राहणाऱ्या तेजल चांदवडकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार 13 नोव्हेंबर 2017  नाशिकच्या लेडीज ग्रुपवर विदुषी सेठ नावाच्या महिलेने मेसेज टाकला होता. 2 ते 15 वर्षे वय असणाऱ्या मुला-मुलींना जाहिरात टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याची आवड असले त्यांचे फोटोशुट नाशिकमध्ये घेणार आहे. ज्यांना आवड असले त्यांनी फेसबुक मेसेंजरवर संपर्क करण्यास सांगीतले. मुलाचे फोटो शुट करण्याची इच्छा असल्याने फेसबुक मेसेंजरवर संपर्क केला. यावर महिलेचा मोबाईल नंबर मिळाला.  मोबाईलव संपर्क साधला असता. आमची‘ रेडक्लिफ ’ नावाची प्रोडक्शन हाऊस कंपनी आहे. कंपनी मुलांना मालिका, चित्रपट, जाहिरात मध्ये काम करण्यासाठी प्रमोट करतो असे सांगत तुमच्या मुलाचे फोटो व्हाटसअपवर पाठवा तसेच प्रॉडक्शन हाऊस कंपनीत नाव नोंदणीसाठी 2 हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. त्यानुसार सौ.चांदवडकर यांनी पेटीएमद्वारे 500 रुपये भरले. यानंतर महिलेचा 10 वाजता फोन आला. बालाजी धबधबा गंगापुररोड येथे फोटो शुट असल्याचे सांगीतले. पतीसमवेत मुलास घेऊन जात फोफो शुट केले. येथे संशयीत विदुषी सेठ हिने तिची आई अंजू बेरॉय सेठ आणि वडील रोहन सेठे यांच्यासोबत ओळख करुन देत अंजू या प्रॉडक्शन कंपनीच्या संस्थापक आहेत. वडील पैशांचे व्यवहार बघतात असे सांगीतले. विश्वास बसल्याने 1500 रुपये दिले. तसेच मुलाचे फोटो आर्चीस कँलेंडरवर देण्यासाठी 1 हजार रुपयांची मागणी केली. येथेच 1 हजार रुपये दिले. काही दिवसांत विदुषी फोनवर संपर्क सधत ‘तुमच्या मुलाची बालाजी टेलीफिल्मस प्रॉडक्शन कंपनीच्या 'ममता-2' साठी निवड झाली आहे, असे सांगत अनामत रक्कम 2 हजार भरण्यास सांगीतले. तेही पेटीएमद्वारे भरले. यानंतर पुन्हा सेठी यांनी तुमच्या मुलाची निवड फँशन बिग बाजारच्या ब्रँड अँम्बेसिडर म्हणून निवड झाली आहे. अनामत पक्कम 2500 रुपये भरण्यास सांगीतले. तेही पेटीएमने दिले.  दोन दिवसांनी व्हाटसअपवर करार पत्र पाठवले. कंपनीच्या स्नेहा नावाच्या मुलीने संपर्क साधत 28 डिसेंबर ते 1 जानेवारी 2017 या कालावधीत बंगळुरु येथे  सिरियल शुटिंग होणार असल्याचे सांगीतले.

मुलासोबत एकाला येण्यास सांगत 11 हजार 733 रुपये भरण्यास सांगीतले. मुलगा पतीसह बंगळुरु येथे गेल्यानंतर कुठलीही शुटिंग नसल्याचे समजले. फसवणूक झालाचे निदर्शनास येताच सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याशी संपर्क साधला. भुजबळ यांनी तक्रारीची गंभीर दखल घेत. संशयीतांला शहरातील एका नामंकित हॉटेलमध्ये ताब्यात घेतले. संशयीतांच्या विरोधात गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येताच संशयीत महिलेला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...