आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • नोटीस बजावल्याचा राग आल्याने कामगारांची व्यवस्थापकाला रॉडने मारहाण Manager Beaten Up By Workers In Nashik Dinamic PVT Company

नोटीस बजावल्याचा राग आल्याने कामगाराची व्यवस्थापकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नोटीस बजावल्याचा राग आल्याने कंपनीतच कामगाराने व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना सातपूर एमआयडीसीत घडली. मारहाणीचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले असून, सातपूर पोलिसांनी दोन कामगारांना अटक केली आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. 


सातपूर औद्योगिक वसाहतीत एम. पी. प्रभू यांच्या मालकीचे तीन कारखाने आहेत. त्यापैकी डायनॅमिक प्रेसस्ट्रेस या कारखान्यात महामार्गावरील उड्डाणपूल बनविण्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण लोखंडी सुटे भाग बनविण्याचे काम केले जाते. तीन युनिट मिळून कारखान्यात २२० कायम, तर ४० कंत्राटी कामगार आहेत. तिन्ही युनिटमधील कामगारांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुरेश चव्हाण या कायम कामगारास कामात सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्याचा राग मनात ठेवून मंगळवारी (दि. १५) दुपारी चव्हाण यांनी कंपनी व्यवस्थापक सचिन भीमराव दळवी यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या गणेश प्रभू यांना धक्काबुक्की करण्यात आली. मारहाण करतानाचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याच्या अाधारे कामगार सुरेश चव्हाण व आनंंद कुमार सिंग या दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. 


दरम्यान, अटक केलेल्या कामगारांच्या समर्थनार्थ तसेच त्यांची सुटका करण्यासाठी तिन्ही युनिटमधील कामगारांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी, बुधवारीही सुरूच होते. 


कंपनी बंद करून महाराष्ट्र सोडून जाईन 
कामगारांच्या अशा वर्तणुकीचा कंटाळा आला आहे. त्यामुळे औद्योगिक शांतता भंग पावत आहे. अशा वातावरणात कंपनी चालवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे कंपनी बंद करून महाराष्ट्र सोडून जाण्याची इच्छा आहे. 
- एम. पी. प्रभू, मॅनेजिंग डायरेक्टर 

 

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा... सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला व्हिडिओ

बातम्या आणखी आहेत...