आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • इगतपुरीत गरोदर महिलेवर कोयत्याने वार; समृद्धी महामार्गाच्या पैशांवरून वाद Pregnant Woman Attacked In Igatpuri Nashik

इगतपुरीत गरोदर महिलेवर कोयत्याने वार करून डोळ्यात टाकली मिरची पावडर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गरोदर महिलेवर तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी कोयत्याने हल्ला करून तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गाच्या पैशावरून कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. 

 

जयश्री गीते असे गदोदर महिलेचे नाव आहे. आरोपींनी जयश्रीसह सरिता गीते, आरती गीते, संजय गीते, कृष्णा गीते यांना कोयता, लाकडी दांडुके, पाईपने बेदम मारहाण केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

 

मिळालेली माहिती अशी की, गीते कुटुंबाला समृद्धी महामार्गाला जमीन दिल्यानंतर 74 लाख मिळाले होते. त्यावरुन या कुटुंबामध्ये वाद झाला, त्यानंतर ही मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी, विष्णू गीते, कुंडलिक गीते, लक्ष्मण गीते, पांडू गीते, काळू गीते, यादव नवले, हिरामण नवले, किशोर गोईकने, भागी गोईकने, द्वारका नवले या सगळ्यांना अटक केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...