आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक तुरुंगात पॅंटच्या नाड्याने कैद्याचा शौचालयात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणार्‍या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमनाथ दगडू शेंडे (वय-50) असे या कैद्याचे नाव आहे. पँटच्या नाड्याने शौचालयात गळफास घेऊन त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  काल (बुधवार) रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

 

सूत्रांनुसार, सोमनाथ शेंडे याने बराक क्रमांक 4 च्या शौचालयात जाऊन गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. कैदी हुसेन मोहम्मद पटेल याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने तत्काळ कैद्यांना आणि कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितली. त्यांनी सोमनाथला खाली उतरवले. सोमनाथ शेंडे याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, यामागील कारण समजू शकले नाही.

 

सोमनाथ मानसिक रुग्ण..

मागील काही दिवसांपासून सोमनाथ शेंडे याचे मानसिक स्वास्थ बिघडलेले अाहे. तो नेहमी तणावात राहातो. याच कारणावरून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज तुरुंग अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...