आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद‌्मावत; पुण्यात ताेडफाेड, जलसमाधी घेणाऱ्या अांदाेलकांचा नाशकात उधळला डाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, नाशिक, जळगाव- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित  ‘पद्मावत’ या बहुचर्चित वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनास सर्वाेच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला असला तरी काही संघटना मात्र अजूनही चित्रपट न चालू देण्यासाठी अाक्रमक अाहेत. गुरुवारी (ता. २५) हा चित्रपट प्रदर्शित हाेत अाहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यातील काही शहरांत करणी सेना व इतर संघटनांनी अाक्रमक अांदाेलन केले. पुण्यात गाड्यांची ताेडफाेड करण्यात अाली. खान्देशातील शिरपूरजवळ बस पेटवून दिली, तर नाशकात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाेलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. मुंबईतही अांदाेलनाचे पडसाद उमटले.  


पुण्यातील वडगाव ब्रीज येथे मंगळवारी मध्यरात्री काही कार्यकर्त्यांनी रास्ता राेकाे करत वाहनांची ताेडफाेड केली. याप्रकरणी राजपूत करणी सेनेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात अाले. यापैकी १५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात अाली. महेश भापकर हे व्यावसायिक या टेम्पाेत माल घेऊन महामार्गावरून जात असताना झेंडे घेऊन अालेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची काच फाेडली. तसेच गाडीची हवाही साेडून दिली. त्यांच्या गाडीच्या मागील बाजूस थांबलेल्या सुमारे अाठ ते दहा वाहनांच्याही काचा फाेडण्यात अाल्या. ‘पद्मावत पिक्चर प्रदर्शित हाेऊ देणार नाही’ अशा घाेषणा देत गाेंधळ घातला.    विदर्भातील अकाेला, बुलडाणा, यवतमाळात पद्मावतला विराेध, रास्ता राेकाे अांदाेलन करण्यात अाले.

 

नाशकात हिंदुत्ववादी संघटना,  करणी सेनेचे कार्यकर्ते ताब्यात
नाशकातील करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गंगापूर धरण परिसरात जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावरच अडवून हे आंदोलन उधळून लावले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला हाेता. ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी पद्मावत नहीं चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात अाली.  दरम्यान, चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या भाजप व मनसेचाही अांदाेलकांनी निषेध केला.    

 

शिरपूरमध्ये बस पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 
‘पद्मावत’च्या  विराेधात मंगळवारी रात्री अज्ञात कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाची बस पेटवली. याप्रकरणी पाेलिसांनी ८ संशयितांना ताब्यात घेतले. पाराेळ्यात महामार्गावर रास्ता राेकाे अांदाेलन करण्यात अाले. शिंदखेड्यात गुरुवारी बंद पाळण्यात येणार अाहे. एसटीची बस नरडाणा रेल्वेस्थानकाकडे जात हाेती. आमोदे गावाजवळ जमावाने  बसच्या काचाही फोडत त्यावर पेट्रोलच्या बाटल्या अाेतल्या. विराेध करणाऱ्या वाहक, चालकास धमकी देत बस पेटवून दिली. हे तरुण करणी सेना जिंदाबाद तसेच संजय भन्साळी मुर्दाबादच्या घोषणा देत होते.

 

चित्रपटगृहाबाहेर  अांदाेलन करणार  
अखिल राजस्थानी समाज संघाचे पुणे अध्यक्ष अाेमसिंग भाटी म्हणाले, ‘अांदोलन करणाऱ्या अामच्या कार्यकर्त्यांना वडगाव धायरीत पाेलिसांनी मारहाण केली. अामच्या कार्यकर्त्यांनी वाहनाची ताेडफाेड केली, मात्र काेणाचीही लूटमार केली नाही. तरीही पाेलिसांनी लूटमारीचा गुन्हा दाखल केला.  गुरुवारी पुण्यातील सर्व चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करून चित्रपटाला अाम्ही विराेध करणार अाहाेत.’  

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... नाशिकमध्ये आंदोलकांचा जलसमाधीच्या प्रयत्नाचा व्हिडिओ आणि पेटवलेल्या बसचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...