आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मराठी भाषा दिन: मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/पुणे- माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान. असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना सांगणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस  मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

 


ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुण्यात झाला. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या 17 व्या वर्षापासून 'बालबोधमेवा' या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. 1942 मध्ये प्रसिद्ध झालेला 'विशाखा' हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.

 

 

कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. 'नटसम्राट' या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तर 1988 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते. एका अर्थाने कुसुमाग्रज सामाजिक चळवळीचे ते प्रणेते होते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...