आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मयत कामगारांच्या २५ पाल्यांना देणार प्रत्येकी अडीच हजारांची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - विविध कारणास्तव मयत झालेल्या कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने येथील कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. १ मे) २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजारांचा धनादेश वितरीत केला जाणार आहे. याशिवाय कामगारांसाठी फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार, सरचिटणीस रवींद्र गिरी यांनी दिली. 

 

सायंकाळी ५ वाजता शहरातील आडवा फाटा येथे फाउंडेशनच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अॅडव्हान्स एन्झाइनचे संचालक किशोर राठी, तहसीलदार नितीन गवळी, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख उपस्थित राहणार आहे. त्यानंतर 'बेटी बचाव, बेटी पढाओ', पाणी बचत संदेश देण्यासाठी भव्य जनजागृती रॅली येथून काढण्यात येणार आहे. गरजू महिलांना कागदी पाऊच व पिशव्या तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण फाउंडेशनच्या वतीने दिले जाणार त्यातून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठीची नावनोंदणी या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. महादेव कॉलनी, संजीवनीनगर येथील फाउंडेशनच्या कार्यालयात सायंकाळी ४ ते ९ यावेळेत कामगार आणि त्यांच्या पाल्यांची बिर्ला आय क्लिनिकच्या वतीने मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. 
याचदरम्यान मान्यवरांच्या हस्ते मयत कामगारांच्या २५ पाल्यांना प्रत्येकी अडीच हजारांच्या मदतीचे धनादेश वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याचे औचित्य साधून मराठमोळ्या लोकगीतांच्या बहारदार संगीतरजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर कामगारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे. कामगारांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...