आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायकदादा यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ला शासनाचा काणेकर पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य शासनातर्फे देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार- २०१६ साेमवारी (दि. ११) जाहीर झाले असून यात नाशिकचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील माेठं नाव, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या ललितलेखाच्या पुस्तकाला अनंत काणेकर पुरस्कार जाहीर झाला अाहे. 


प्राैढ वाङमय, ललितगद्य विभागात एक लाख रुपयांचा हा पुरस्कार अाहे. या पुस्तकात चार विभागांतून अनेक अनुभवच त्यांनी मांडले अाहेत. स्मरणांकित या विभागात विविध अाठवणी त्यांनी शब्दातीत केल्या अाहेत. त्या व्यक्तिगत जरी असल्या तरी त्यांच्या मांडणीमुळे त्या वाचकाला धरून ठेवतात तर त्यानंतर येणारा रागदरबारी विभागही रंजक अाणि राेचक अाहे. चाेवीस लेख असलेल्या या विभागात राजकीय घटना-प्रसंगांचे रंग दिसतात. 


तिसऱ्या शेती विभागात ३५ लेख असून, शेतकऱ्यांच्या यशाेगाथा त्यात वाचायला मिळतात तर साहित्य पाैर्णिमा या बारा लेखांच्या विभागात साहित्य-संस्कृतीविषयक अनुभवांना दादांनी वाचकांपुढे ठेवले अाहे. असा एकाच पुस्तकातून त्यांनी सर्व विषयांना स्पर्श केला अाहे. 


दादांच्या या पुस्तकाबराेबरच नाशिकचेच कवी, पत्रकार अजित अभंग यांच्या ‘गैबान्यावानाचं’ या कवितासंग्रहाला बहिणाबाई चाैधरी पुरस्कार जाहीर झाला अाहे. ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे. साहित्य क्षेत्रातील हे मानाचे दाेन पुरस्कार नाशिकच्या लेखकांना मिळाल्याने साहित्य वर्तुळात अानंदाचे वातावरण अाहे. 


अनपेक्षित अानंद 
हा क्षण अनपेक्षित अानंदाचा अाहे असे म्हटले तरी हरकत नाही. पुस्तक डिसेंबरमध्येच अाले. त्यानंतर अशा वेगळ्या धाटणीच्या पुस्तकाला अनंत काणेकरांच्या नावाचा एवढा माेठा पुरस्कार मिळणं यासारखा दुसरा अानंद ताे काय? 
- विनायकदादा पाटील, लेखक, माजी मंत्री 

बातम्या आणखी आहेत...