Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Legislative council election process, today practice of vote counting

विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया, अाज मतमोजणीची रंगीत तालीम

प्रतिनिधी | Update - May 23, 2018, 08:25 AM IST

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शांततेत झालेल्या मतदानानंतर आता साऱ्यांच्या नजरा मतम

  • Legislative council election process, today practice of vote counting

    नाशिक- विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शांततेत झालेल्या मतदानानंतर आता साऱ्यांच्या नजरा मतमोजणी आणि निकालाकडे लागून आहेत. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पद्धतीबाबतही प्रचंड उत्सुकता असून, मोजणीसाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे. त्याची रंगती तालीम अाज बुधवारी (दि. २३) होणार असून दोन टेबलांवर प्रत्येकी एक उपजिल्हाधिकारी, एक तहसीलदार आणि नायब तहसीलदार, शिपाई अशी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


    जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवरील मतपेट्या एकत्र करून त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागातील स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि. २४) मतमोजणी होणार असून, या मतपेट्या सकाळी ६.३० वाजता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष स्ट्राँगरूममधून काढल्या जातील. त्यानंतर सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेच्या इमारतीत मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दोन टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आणि शिपाई असेल. प्रत्येक उमेदवाराचे दोन प्रतिनिधी आणि उमेदवारास स्वत: उपस्थित राहता येईल. यासाठी उपजिल्हाधिकारी वासंती माळी, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, दुसऱ्या टेबलवर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शरद घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रारंभी सर्व मतपेट्यांचे सील उमेदवारांच्या समक्ष तोडण्यात येईल. त्यानंतर मतमोजणी सुरू केली जाईल. तांत्रिक अडचण निर्माण न झाल्यास दुपारी १२ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.


    विजयाचा रंग काेण उधळणार?
    नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन विभाग गुरुवारी (दि. २४) हाेणाऱ्या विधानपरिषदेच्या मतमाेजणीसाठी सज्ज हाेत अाहे. या इमारतीच्या बाहेर फलक लावण्याचे अाणि रंगरंगाेटीचे काम सुरू हाेते. त्याचवेळी विजयाचा रंग काेणत्या पक्षाचा अाणि गुलाल काेण उधळणार याचीच चर्चा यानिमित्ताने रंगली.

  • Legislative council election process, today practice of vote counting

Trending