आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुडूपातून अचानक बिबट्याने झेप घेतली, मी त्याच्या चेहऱ्यावर चापटा मारल्या, अखेर ताे पळाला अन् मी वाचलाे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- संक्रांतीच्या दिवशी दुपारच्या वेळी शेतात पाणी भरायला गेलाे. बांधाजवळ गवत वाढलेले हाेते. या गवतात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक माझ्यावर हल्ला केला. ताे इतका वजनदार हाेता की मी क्षणात खाली पडलाे. अाजूबाजूलाही काेणी नसल्याने मी जाेरजाेरात अावाज करायला सुरुवात केली. त्याच्या ताेंडावर पूर्ण ताकदीनिशी चापटा मारल्या. अखेर ताे घाबरून पळून गेला... गिरणारे परिसरातील नाईकवाडी गावातील २७ वर्षांचा मुरलीधर जगन निंबेकर हा 'दिव्य मराठी'कडे अापला थरारक अनुभव सांगत हाेता. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरच हादरून गेला अाहे. 


गिरणारे परिसरातील नाईकवाडी, दाबडगाव, वाडगाव व मळे परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढला अाहे. अनेक ठिकाणी शेळ्या, वासरे व कुत्रे खाण्याच्या घटना अाजवर घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ दहशतीच्या छायेत अाहेत. संक्रांतीच्या दिवशी गिरणारे परिसरातील नाकटेंभी येथील नदीकिनारी नाईकवाडी येथील मुरलीधर जगण निंबेकर या तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. मात्र, या तरुणाच्या शर्थीच्या प्रतिकाराने बिबट्या पळाला. या हल्ल्यात निंबेकरच्या कपाळ, छाती, पाठ अाणि हाताला जखमा झाल्या अाहेत. त्याच्यावर गिरणारा येथील दवाखान्यात उपचार करण्यात अाले. 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने हल्ल्यातील जखमी मुरलीधरचा शाेध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला असता अंगावर शहारा अाणणारा अनुभव त्याने सांगितला.


यापुढे घटना घडल्यास वनविभाग जबाबदार 
परिसरात तातडीने पिंजरे लावण्यात यावे. यापुढे विपरित घटना घडल्यास वनविभागाला जबाबदार धरण्यात येऊन अांदाेलन छेडण्यात येईल. यासंदर्भात अाम्ही मंगळवारी वनविभागातील अधिकाऱ्यांची भेट घेणार अाहाेत.
- अनिल थेटे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 


तातडीने पिंजरा लावू 
गिरणारे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी झाल्याची घटना अाम्हाला सायंकाळी समजली. मंगळवारी अाम्ही माहिती घेण्यासाठी जात अाहाेत. माहिती घेऊन तातडीने परिसरात पिंजरा लावण्यात येईल. 
- प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...