आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 84 हजार 374 शेतकऱ्यांना 374.32 काेटींच्या कर्जमाफीचा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८४ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांना एकूण ३७४ कोटी ३२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात ५६ हजार २९६ शेतकऱ्यांना कर्जमाफी तर २८ हजार ७८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला आहेे. शेवटच्या पात्र शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली. 


शासनाने ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली हाेती. तसेच कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. २०१५-१६ अाणि २०१६-१७ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील एक लाख ६८ हजार ८३५ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी एक लाख ३० हजार ९९३ प्रत्यक्ष कर्जमाफी आणि ३७ हजार ८४२ इतके प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान मिळणारे शेतकरी आहेत. 


जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत एक लाख ३८ हजार सभासद शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ७८ हजार ७५४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आजपर्यंत ३३३ कोटी २४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांनी दिली. 


शासन नियमानुसार कर्जमाफीसाठी पात्र ५१ हजार ८१७ लाभार्थ्यांच्या बँक कर्जखात्यात २८४ कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये पुनर्गठन झालेल्या शेतकरी सभासदांनादेखील लाभ मिळाला आहे.


जिल्हा बँकेच्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा सभासदांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या २६ हजार ९३७ लाभार्थी सभासदांच्या खात्यात प्रोत्साहनपर ४८ कोटी ७५ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. एकवेळ समझोता योजनेंतर्गत (ओटीएस) येणाऱ्या २६ हजार ७२८ पात्र शेतकऱ्यांना आपल्या हिश्श्याच्या रकमेचा भरणा करून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेतर्फे करण्यात आले आहे. जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, काही बँकांतील शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाचे चित्र ....

बातम्या आणखी आहेत...