आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टाेइंग’चा महाघाेळ... रिक्षा उचलण्यास 25 रुपये तर दुचाकीसाठी तब्बल शंभर रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अत्यंत वादग्रस्त अशा वाहतूक पाेलिसांच्या टाेइंग सेवेतून ठेकेदार कशा पद्धतीने कमाईच्या संधी साधत अाहेत याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले अाहे. जेथे ट्रकसारखे अवजड वाहन उचलण्यासाठी ८० रुपये, रिक्षा उचलण्यासाठी २५ रुपये अाकारणीची तयारी दाखवणारे ठेकेदार मात्र दुचाकी उचलण्यासाठी तब्बल १०१ रुपये नाशिककरांकडून वसुलीच्या तयारीत अाहेत. दुचाकी वसुलीत मिळणाऱ्या गलेलठ्ठ भाड्यावर डाेळा ठेवून रिक्षा ट्रकसारखी अवजड माेठी वाहने स्वस्तात उचलण्याची तयारी दाखवून कंत्राट मिळवण्याची क्लृप्तीही यानिमित्ताने उघड झाली अाहे. हा घाेळ बघून पाेलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले असून त्यावर काय निर्णय हाेताे याकडे लक्ष लागले अाहे. 


पाेलिस अायुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या क्षेत्रात बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांवर टाेइंगद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी महापालिका पाेलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या नाे पार्किंग क्षेत्रात लावलेल्या गाड्या ठेकेदाराची माणसे वाहनात टाकतात. त्यानंतर वाहतूक पाेलिस शाखेत ही वाहने जमा हाेतात. या ठिकाणी नाे पार्किंगचा भंग केल्याचे वाहतूक शाखेचे शुल्क वेगळे तर ठेकेदाराचा वाहतूक खर्च स्वतंत्ररित्या घेतला जाताे. अर्थात ठेकेदाराचा वाहतुक खर्च पाेलिसांकडून निश्चित केला असल्यामुळे त्यापेक्षा अधिक अाकारणी हाेत नसते. 


यापूर्वी पाेलिस अायुक्तालयस्तरावर ठेका देण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया हाेत हाेती. यंदा मात्र, पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल सहकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पारदर्शक प्रक्रियेसाठी इ-निविदा पद्धतीचा अवलंब केला. जेणेकरून वाहने उचलताना बेशिस्तांना याेग्य पद्धतीने दंडदेखील हाेईल त्यात नाशिककरांचे नुकसान हाेणार नाही अशी काळजी हाेती. मात्र कसलेल्या ठेकेदारांनी प्रशासनाला काेंडीत पकडत स्वतचे ईप्सित साधण्याची लढवलेली शक्कल बघून पाेलिसही चक्रावले अाहेत. ठेकेदारांनी निविदा पद्धतीने बंद लिफाफ्यात भरलेले देकार नुकतेच खुले झाले असून त्यातून टाेईंगची व्यवस्था ठेकेदारांचे कुरण बनल्याचे लक्षात येते. 


यापूर्वी बदलल्या ठेकेदारांसाठी अटी 
नियमानुसारतीन निविदांना प्रतिसाद मिळाल्यास चाैथ्या निविदेत भलेही एक जरी ठेकेदार उरला तरी त्यास काम देणे क्रमप्राप्त असते. तत्पूर्वी तीन निविदात किमान तीन मक्तेदार येणे अपेक्षित असते. या प्रकरणात तीनपेक्षा अधिक ठेकेदार हाेते मात्र, त्यांचा अाक्षेप ठेक्यातील अटींवर हाेता. त्यात वाहन उचलण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणे, स्वमालकीच्या गाड्या असणे, कर्मचाऱ्यांचा गणवेश, पीएफ, ईएसअाय अन्य तांत्रीक कायद्यानुसार असलेल्या संरक्षणाबाबत सक्ती हाेती. त्याविराेधात ठेकेदारांनी प्रतिसाद देण्याची भूमिका घेतल्यावर अटी बदलणे भाग पडले. 


स्वतंत्र कामे दिली तर मिटेल घाेळ 
अत्यंतसाेेपे बदल केले तर बेशिस्त नाशिककरांचा खिसा खाली हाेणार नाही या पद्धतीने पाेलिसांना दंड अाकारणीद्वारे शिस्त लावण्याचे व्यवस्थापन करता येईल. या निविदेत मुळात पाेलिस प्रशासनाने स्वत:चे असे काेणते दर निश्चित केलेले नव्हते कायद्याच्या दृष्टीने ते रास्तही अाहे. मात्र, अाता जर दुचाकीसाठी ६९ रुपये दर श्रमसाफल्य अाकारणार असेल तर केवळ याच वर्गवारीतील वाहन त्यांना उचलण्यासाठी दिले तर नाशिककरांचा फायदा हाेऊ शकताे संभाव्य भ्रष्टाचाराला चाप लागू शकताे. रिक्षा उचलण्यासाठी जर २५ रुपये इतका सर्वात कमी दर जर श्रमसाफल्यकडूनच अाकारणी हाेत असेल तर त्या वर्गवारीचे काम त्यांनाच देणे अपेक्षित अाहे. अवजड वाहने तथा टेम्पाेसारख्या वर्गवारीत जर अंबिका सर्व्हिसेस ७५ रुपये प्रतिवाहन घेत असेल तर सर्वात कमी दर म्हणून त्या वर्गवारीचे काम त्यांना देणे अपेक्षित अाहे. चारचाकी कार वा जीपसारख्या वाहनात अशाच पद्धतीने ४४० रुपये प्रतिवाहन या पद्धतीने अंबिका सर्व्हिसेसला काम देणे क्रमप्राप्त अाहे. मात्र तसे करता एकत्रित दराचा विचार करून अंबिका सर्व्हिसेसला टाेइंगमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असलेला दुचाकी उचलण्याचे कंत्राट तीस टक्के अधिक दराने देण्याची बाब घाेटाळ्याकडे अंगुलीनिर्देश करते. 


यासाठी रिक्षा, ट्रकची स्वस्तात उचलेगिरी 
दुचाकीपेक्षाट्रक वा रिक्षा उचलणे स्वस्त कसे या प्रश्नाच्या खाेलात शिरल्यानंतर हा घाेळा कसा हाेऊ शकताे हे लक्षात येते. या ठिकाणी श्रमसाफल्य सर्व्हिसने दुचाकी उचलण्यासाठी सर्वात कमी म्हणजेच ६९ रुपये दर भरला अाहे. त्याखालाेखाल दिग्विजय एंटरप्राइजेसने ८५ रुपये, अंबिका सर्व्हिसेसने ९९ रुपये तर सिद्धी सर्व्हिसने १०१ रुपये असे दर अाहेत. येथे सर्वात कमी दर म्हणून श्रमसाफल्यला ६९ रुपयांप्रमाणे प्रतिदुचाकी उचलण्याचे कंत्राट देणे अपेक्षित अाहे, मात्र निविदेत चारही वाहने उचलण्याचे दर एकत्र करून ज्यांचे दर कमी येतील त्यांना काम देण्याचा नियम अाहे. येथे मग अंबिका सर्व्हिसेसने भलेही दुचाकीसाठी श्रमसाफल्यपेक्षा ३० टक्के अधिक दर भरले असले तरी, टेम्पाे वा ट्रकसाठी नगण्य दर भरल्याने जेव्हा एकत्रित हिशेब झाला तेव्हा तुलतेन त्यांचे निविदा दर कमी ठरले. दुचाकी टाेइंगद्वारे वसुलीत माेठा फायदा असल्याने भलेही ट्रक रिक्षाचे दर कमी दाखवले तरी दुचाकीतून ताे फायदा नुसता निघणार नाही तर पाचही बाेटे तुपात अशीच गत हाेईल. 


माेठ्या गाड्यांपेक्षा चारपट भाडे 
यास्पर्धेतील चारही मक्तेदारांनी दुचाकी, रिक्षा (तीनचाकी) चारचाकी त्यापेक्षा माेठी वाहने उचलण्यासाठी प्रति गाडीमागे किती दर अाकारणी हाेईल याबाबत देकार कळवले. त्यात दुचाकी उचलण्यासाठी श्रमसाफल्य सर्व्हिसने ६९ रुपये, दिग्विजय एंटरप्रायजेसने ८५ रुपये, अंबिका सर्व्हिसने ९९ रुपये तर सिद्धी सर्व्हिसने १०१ रुपये असे दर भरले. मात्र याच ठिकाणी दुचाकीपेक्षा माेठ्या असलेल्या रिक्षेसाठी श्रमसाफल्य सर्व्हिसने २५, दिग्विजय एंटरप्रायजेसने ३८० रुपये, अंबिका सर्व्हिसेसने ३० रुपये तर सिद्धी सर्व्हिसने ३१ रुपये असे दर भरले. त्यापेक्षाही अवजड अशा ट्रकसारख्या माेठ्या वाहनासाठी श्रमसाफल्य सर्व्हिसने १२५, दिग्विजय एंटरप्रायजेसने ५०० रुपये, अंबिका सर्व्हिसेसने ७५ रुपये तर सिद्धी सर्व्हिसने १०० रुपये असे दर भरले अाहेत. हे बघितल्यानंतर दुचाकी उचलण्यासाठी अधिक खर्च येताे की रिक्षा वा ट्रकसारख्या माेठ्या वाहनांना याबाबत काेणालाही अधिक सांगण्याची गरज नाही. 


समिती बैठकीत कायदेशीर चर्चा करणार 
वाहनांच्या टाेइंग निविदेबाबत ठेकेदारांकडून प्राप्त झालेल्या दराच्या देकारासंदर्भात अालेल्या अाक्षेपांबाबत पाेलिस अायुक्तालयाच्या निविदा समितीच्या बैठकीत चर्चा केली जाईल. त्यावर कायदेशीर मार्गाने याेग्य ताे निर्णय घेतला जाईल. 
-अजय देवरे, सहायक पाेलिस अायुक्त, वाहतूक शाखा 

 

पुढील स्लाइडवर ग्राफिक्सच्या माध्यामातून पाहा, अशी अाहेत वाहने... 

बातम्या आणखी आहेत...