आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेसह सासूचा विनयभंग; चांडक पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- किरकोळ कारणावरून वाद निर्माण करीत नाेकरास मारहाण व घरातील सासू-सुनेला शिवीगाळ केल्याचा अाणि त्यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा गाेविंदनगर येथे राहणाऱ्या चांडक पिता-पुत्राविरुद्ध मुंबईनाका पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात अाला अाहे. 


पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिडके काॅलनीत राहणाऱ्या विवाहितेने तक्रार दिली अाहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गाेविंदनगर येथे राहणाऱ्या कुणाल प्रकाश चांडक व त्याचे वडील प्रकाश रामनाथ चांडक यांनी विनापरवानगी घरात घुसून वाद घातला. याचवेळी घरातील नाेकराने बाेलण्याचा प्रयत्न केल्यास त्यास मारहाण करीत समाेरच असलेल्या सासू-सुनेला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडवल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. या तक्रारीनुसार मुंबईनाका पाेलिस ठाण्यात चांडक पिता-पुत्राविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 


याच गुन्ह्यात दाेघांना पाेलिसांनी अटक करून गुरुवारी (दि. २६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला अाहे. या गुन्ह्यात घरातील नोकरास मारहाण करून महिलेसह तिच्या सासूकडे पाहून अश्लील हावभाव करीत विनयभंग केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...