आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या २५ हून अधिक परीक्षार्थींचे पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल अखेर दोन वर्षांनी बुधवारी (दि. २०)जाहीर झाला. यामध्ये औरंगाबाद येथील समाधान दौंड याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील स्वप्नील चावडेश्वर यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून, तर सांगली येथील सुप्रिया गायकवाड हिने महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत नेत्रदीपक यश मिळवले आहे. 


राज्यभरातील ७५० पोलिस उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी दहा हजार ३३१ उमेदवार प्रविष्ट झाले होते. लेखी परीक्षा निकालाच्या आधारे तीन हजार ८५ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. मुख्य परीक्षा, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीमधील गुणांच्या आधारे ७५० उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. यात नाशिकमधील विजया पवार, वृषाली पवार, राहुल सानप, राहुल आव्हाड, विनोद खांडबहाले, सुशील सोनवणे, नीलेशकुमार वाघ, प्रदीप फुंडे, पुंडलिक थेपाने, सीमा खंडागळे, रोहिणी जाधव, समाधान फडोळ, मनोज अहिरे, यांना यश मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...