आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिक्षेकऱ्यांना धर्मादाय विभाग करणार कामासाठी प्रवृत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंहस्थ नगरीमुळे नाशिक शहरात भिक्षेकऱ्यांची संख्याही माेठ्या प्रमाणात वाढली अाहे. उघड्यावरच रहिवास करताना या भिक्षेकऱ्यांना अनंत अडचणी येतात. अनेक धडधाकट भिक्षेकरी तरुण वयातही भिक्षा मागताना दिसतात. ही बाब लक्षात घेऊन अाता धर्मदाय अायुक्तालयाने भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करण्याची याेजना अाखली अाहे. येत्या मार्च महिन्यापासून या याेजनेची अमलबजावणी करण्यात येणार अाहे. 


१८ ते ६० या वयोगटातील काम करण्याची क्षमता असणाऱ्या भिक्षेकऱ्यांना कामासाठी प्रवृत्त केले जाऊन त्यांना उद्योजकांकडे कामासाठी पाठविण्यात येणार आहे. तर ६० वर्षाच्या पुढील भिक्षेकऱ्यांना विविध संस्थांच्या वृध्दाश्रमात प्रवेशित करण्यात येणार आहे. या अभियानासाठी विविध सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येणार अाहे. 


वास्तविक, नाशिक ही सिंहस्थ नगरी असल्याने कायद्यानुसार येथे भिक्षेकऱ्यांसाठी निवारागृह अाणि पुनर्वसन केंद्र असणे कायद्यानुसार अावश्यक अाहे. मात्र, भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनावर फारसे कामे केली जात नसल्याचे दिसते. बहुतांश शहरातही अशीच परिस्थिती अाहे. 

बातम्या आणखी आहेत...