आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूविक्रीविराेधात स्मशानभूमीत उपाेषण; घोरवडचे 12 नागरिक व्यसनाधीनतेने दगावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- सिन्नर-घोटी महामार्गावरील हाॅटेलात उघडपणे देहविक्री, अवैध मद्यविक्री व्यवसाय चालतो. घोरवडचे ग्रामस्थ व्यसनाधीन होत असून, त्यातील १२ जणांवर अपघाताने मृत्यू ओढवला आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही व्यवसाय सर्रास सुरू असल्याने अखेर सदाशिव भागूजी हगवणे या ग्रामस्थाने थेट स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू केले आहे. समजूत घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही आता तुमच्यावर भरोसा नाही, असे ग्रामस्थांनी सुनावल्याने पोलिस खाते चांगलेच पेचात सापडले आहे. 


घोरवड शिवारात महामार्गावरील ओम साई उत्सव हॉटेलात देहविक्री, अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार हगवणे यांनी पोलिस अधीक्षक, सिन्नर पोलिस ठाणे, आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे केली होती. या व्यवसायामुळे गावातील १० ते १२ जण अपघातात दगावल्याने संसार उघड्यावर पडले अाहेत. ते व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी केली होती. संबंधित व्यवसायांवर कारवाई झाल्यास प्राणांतिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. कारवाई झाल्याने हगवणे यांनी गावातील स्मशानभूमीत बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. रामदास नवाळे, शिवाजी हगवणे, भीमाजी मोरे, भाऊराव बोराडे, दशरथ लहामटे, गवारी यांचा मृत्यू झालेल्यांत समावेश आहे. हगवणे यांनी उपोषण सुरू करताच रात्री उशीरा गावातील अरुण हगवणे, अनिल हगवणे, सोमनाथ हगवणे, चेतन हारक, विजय हगवणे, अमोल हगवणे, किरण हगवणे, योगेश कडवे, लहानू हगवणे यांच्यासह १०० ग्रामस्थांनी स्मशानात ठाण मांडले आहे. 


पोलिस माघारी फिरले 
सिन्नरपोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख हे अापल्या सहकाऱ्यांसह घोरवड येथे उपाेषणकर्त्या ग्रामस्थांची समजूत घालण्यासाठी रात्री उशिरा गेले होते. तथापि, उपाेषणकर्ते सदाशिव हगवणे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. आता पोलिसांवर भरोसा राहिला नसल्याचे त्यांनी देशमुख यांना सांिगतले. उपोषणाचा तिढा कसा सुटणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...