आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार पूनम महाजन यांनी मोर्चास ठरवले ‘शहरी माअाेवाद’; डाव्‍यांची माफीची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रक्ताने माखलेल्या पायाने १८० किलोमीटर पायी चालत मुंबईत धडकणाऱ्या शेतकरी व अादिवासी बांधवांच्या लाँग मार्चला भाजप खासदार पूनम महाजन यांनी थेट शहरी माओवादी ठरवले. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे डावे अाक्रमक झाले अाहेत. २४ तासांच्या आत खासदार महाजन यांनी जाहीर माफी न मागितल्यास राज्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊन देणार नसल्याचा इशारा माकपचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. डी.एल. कराड आणि डाव्या संघटनांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात हे वक्तव्य महाजन यांना चांगलेच भाेवण्याची शक्यता अाहे. 


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी नाशिक ते मुंबईत काढण्यात अालेल्या लाँग मार्चमध्ये हजाराे शेतकरी बांधव सामील झाले हाेते. जर-तरच्या या लढाईत वेळप्रसंगी शहीद हाेण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात अाला हाेता. पायाला फाेड अाल्यानंतरही तसूभरही मागे न हटणाऱ्या शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला ‘शहरी माअाेवाद’ ट्विट करून महाजन यांनी एकप्रकारे शेतकऱ्यांच्या या माेर्चाची चेष्टा केली अाहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी माेर्चाची तत्काळ दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदत मागून घेतली, तर दुसरीकडे खासदारांकडून माेर्चाची थट्टा केल्याने डाव्यांच्या संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली अाहे.

बातम्या आणखी आहेत...