आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेची घरपट्टी वाढ 18 टक्के; रकमेत फरक मात्र 36 टक्के

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महासभेने फेब्रुवारीत शहरातील जवळपास चार लाख जुन्या मिळकतींच्या करयाेग्य मूल्यात १८ टक्के वाढ केली असली तरी, प्रत्यक्षात पहिल्या सहामाहीचे देयक हातात पडल्यानंतर जुने देयक व नवीन देयकातील तफावतीची रक्कम ३६ ते ३८ टक्के अधिक दिसत असल्यामुळे नाशिककर चक्रावले अाहेत. त्याचे कारण म्हणजे, मिळकतधारक जुन्या घरपट्टीच्या देय रकमेवर १८ टक्के वाढ धरून हिशेब करत अाहेत, तर महापालिकेचा हिशेब मात्र करयाेग्य मूल्याच्या १८ टक्के वाढ असा अाहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महापालिका याेग्य असली तरी, प्रत्यक्षात नागरिकांच्या खिशावर मात्र घरपट्टीपाेटी गेल्या वर्षापेक्षा ३८ टक्क्यांपर्यंत अधिक रकमेचा बाेजा पडत अाहे. 


पालिका अायुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंढेंनी शहरातील मिळकतींवर तब्बल ३३ टक्के घरपट्टी वाढीचा प्रस्ताव अाणला. त्याला सर्व स्तरातून जाेरदार विराेध झाल्यानंतर निवासी क्षेत्राच्या करयाेग्य मूल्याचा प्रस्ताव विराेधी पक्षाच्या रेट्यामुळे १८ टक्क्यांपर्यंत अाणला गेला. या पार्श्वभूमीवर नव्या अार्थिक वर्षाच्या प्रारंभी पालिकेने करयाेग्य मूल्यात १८ टक्के वाढ करून घरपट्टी देयके वितरित करण्यास सुरुवात केली अाहे. ही देयके पाहून मिळकतधारक मात्र बुचकळ्यात पडत अाहेत. कारण, सामान्यपणे अापण गेल्या वर्षी जी घरपट्टीची रक्कम भरली, त्यावर १८ टक्के वाढ हाेईल, असा हिशेब करण्यात येत हाेता. परंतु, प्रत्यक्षात १८ टक्के वाढ ही या रकमेवर नसून, करयाेग्य मू्ल्यावर अाधारित असल्याने गेल्या वेळच्या तुलनेत तब्बल ३६ ते ३८ टक्के रक्कम घरपट्टीपाेटी अाता भरावी लागणार अाहे. उदाहरणार्थ, गेल्या वेळी १००० रुपये करयाेग्य मूल्य असलेल्या मिळकतीची घरपट्टी ४३० रुपये हाेती. त्यामुळे अापल्याला ४३० रुपयांवर १८ टक्के अधिक, म्हणजेच ४३०+७५ या प्रमाणे सुमारे ५०५ ते ५१० रुपयांपर्यंत घरपट्टी भरावी लागेल, असा समज मिळकतधारकांचा झाला. पण, प्रत्यक्षातली ही १८ टक्के वाढ १००० रुपये या करयाेग्य मूल्यावरील असल्याने देयकात मात्र १८० रुपयांची वाढ हाेऊन ४३०+१८० असे ६१० रुपयांचे देयक हाती पडल्याने वाढ नेमकी किती टक्के, असा संतप्त सवाल मिळकतधारक करीत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...