आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिका निवडणूक: त्र्यंबकमध्ये भाजप, इगतपुरीत शिवसेनेची एकहाती सत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकेश्वर / इगतपुरी- देशातील महत्त्वाचे ज्योर्तिलिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली. येथील १७ पैकी १४ जागा तसेच नगराध्यक्षपदही भाजपने आपल्याकडे राखत दणदणीत विजय मिळविला. पुरुषाेत्तम लाेहगावकर हे नगराध्यक्षपदी विजयी झाले. 


शिवसेनेने दोन तर अपक्षाने एका जागेवर विजय मिळविला. यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून िनवडून येणार असल्याने चुरस निर्माण झाली हाेती. मतविभागणीचा भाजपला फायदा झाला असून, व्यूहरचना यशस्वी झाल्याने बंडखाेरांचा खात्मा झाला. इगतपुरी नगरपरिषदेवर २५ वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेनेने पुन्हा सत्ता हस्तगत केली. 


नगराध्यक्ष पदासाठीच्या लढतीत शिवसेनेच्या संजय इंदुलकर यांनी भाजपच्या फिरोज पठाण यांचा ८६९ मतांनी पराभव केला. नऊ प्रभागांतील १८ जागांपैकी १३ जागांवर सेनेने निर्विवाद वर्चस्व मिळविले. तर भाजपला जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या बहुजन विकास आघाडीनेदेखील चांगली मते मिळवत अस्तित्व दाखवले. इगतपुरीत गत तीन निवडणुकीत नगरसेवक ठरलेले भाजपचे यशवंत दळवी, माजी नगरसेवक विजय गोडे, शोभराज शर्मा, मिलिंद हिरे यांचा पराभव झाला. विद्यमान नगरसेवक नईम खान, सुनील रोकडे, उज्ज्वला जगदाळे, माजी नगरसेवक गजानन कदम यांचा विजय झाला. 


प्रभाग ‘अ’मध्ये भाजपचे सागर आढार यांना ७१९ तर शिवसेनेच्या किशोर बगाड यांना ७७९ मते मिळाली. ६० मताने आढार यांचा पराभव झाला. प्रभाग ‘ब’मध्ये अपक्ष संपत डावखर यांना ७४६ तर, शिवसेनेच्या धोंडीराम डावखर यांना ६८८ मते मिळाल्याने त्यांचा ५८ मतांनी पराभव झाला. प्रभाग ‘ब’मध्ये भाजपच्या साबेरा पवार यांना ७४८ तर शिवसेनेच्या लतीफा सय्यद यांना ६९८ मते मिळाली. पवार यांनी ५० मतांनी ही लढाई जिंकली. प्रभाग ‘ब’मध्ये शिवसेनेच्या उज्ज्वला जगदाळे यांना ६४५ तर भाजपच्या लता शिंदे यांना ६२७ मते मिळाली. अवघ्या १८ मतांनी शिंदे यांचा पराभव झाला. 


व्यूहरचना यशस्वी 
त्र्यंबकेश्वरमध्ये मतविभागणीचा फायदा मिळवत भाजपची व्यूहरचना यशस्वी झाल्याने बंडखाेरांचा खात्मा. १७ पैकी १४ जागा तसेच नगराध्यक्षपदही भाजपकडे. शिवसेनेला फक्त दोन तर अपक्षाचा एका जागेवर विजय झाला. 


निर्विवाद वर्चस्व 
इगतपुरीत २५ वर्षांपासूनची एकहाती सत्ता शिवसेनेने कायम राखली. १८ पैकी १३ जागांवर शिवसेनचा विजय. भाजपला तर एका जागेवर अपक्षाचा विजय. काँग्रेस सपाटून आपटली असून भारिपची कपबशी फुटली. 


सटाण्यात राष्ट्रवादीच्या आशा भामरे विजयी 
सटाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ‘अ’मधील पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीच्या आशा रमेश भामरे यांचा ४८ मतांनी विजय झाला. त्यांनी भाजपच्या उमेदवार नर्मदा सोनवणे (५९६) यांचा पराभव केला. यामुळे भाजपला नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सटाणा शहर विकास आघाडी मोठा धक्का बसला आहे. 

बातम्या आणखी आहेत...