आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक- भुसावळ शटल २० जुलैपर्यंत राहणार बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीसाठी देवळाली- नाशिक- भुसावळ शटल २३ जून ते २० जुलैपर्यंत सुमारे एक महिना बंद करण्यात येणार आहे. मात्र, उर्वरित गाड्या या वेळेवर धावणार आहेत. 


शटल ही दिवसातील शेवटची गाडी असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र, या दरम्यान इतर गाड्या काही वेळेच्या अंतरावर धावत असतात त्यामुळे प्रशासनाला ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी वेळ मिळणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सकाळी भुसावळकडे आणि रात्री नाशिकरोडकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...