Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | nashik teachers constituency election news

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचा बेडसेंना पाठिंबा : हिरे

प्रतिनिधी | Update - Jun 07, 2018, 08:47 AM IST

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यक्तींनाच आमदार म्हणून पाठविण्याची गरज आहे. भाजप-सेनेच्या स

 • nashik teachers constituency election news

  नाशिकरोड- शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण क्षेत्राशी निगडित व्यक्तींनाच आमदार म्हणून पाठविण्याची गरज आहे. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये शिक्षकांसह शिक्षण संस्थाचालकांसमोर समस्यांचा महापूर आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज असतानाही भरती करता येत नसून यास भाजप-सेना जबाबदार असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी केले. बेडसे यांना पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊन पाठिंबा जाहीर करण्यास सांगितल्याचे हिरे यांनी सांगितले. संदीप बेडसे यांनी शिवसेना टीडीएफच्या नावाचा गैरवापर करत असल्याचे बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.


  शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयामध्ये संदीप बेडसे यांनी शिक्षक मेळावा घेतला. यावेळी मंचावर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षासह पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. हिरे यांनी शिक्षक लोकप्रतिनिधीने समस्या सोडविण्यासाठी विशेष भर द्यावा. यावेळी हिरे यांनी शिवसेना-भाजप सरकार शिक्षकांविरोधी असल्याने राष्ट्रवादी उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर बेडसे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, जे. यू. ठाकरे, टी. एफ. पवार, टीडीएफ अध्यक्ष विजय बहाळकर, हिरालाल पगडाल, राजेंद्र डोखळे, पुरुषोत्तम रकिबे, दशरथ जारस, एस. बी. शिरसाठ, हिरामण शिंदे, सखाराम जाधव, के. के. अहिरे, रंजन ठाकरे, गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, नानासाहेब महाले, मनोहर बोराडे उपस्थित होते.


  १३ उमेदवारांचे जणांचे एकूण २० अर्ज दाखल
  शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यासाठी ७ जून ही अंतिम मुदत आहे. सहा दिवसांत पाच अर्ज दाखल झाले होते. सातव्या दिवशी संदीप त्र्यंबकराव बेडसे, किशोर भिकाजी दराडे, सुनील धोंडू फरस, शालिग्राम नामदेव भिरुड, बाबासाहेब संभाजी गांगरडे, आप्पासाहेब रामराव शिंदे, गजानन काशीराम खराटे, रवींद्र भिवाजी पटेकर अशा आठ जणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण १३ जणांनी २० अर्ज दाखल केले आहे. बुधवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते.


  टीडीएफचा पाठिंबा बेडसे यांना : बहाळकर
  पुणे येथील बैठकीत टीडीएफच्या १९ पैकी १८ जणांनी संदीप बेडसे यांना पाठिंबा दिला. कार्याध्यक्ष असलेले फिरोज बादशहा हे लग्नाचे कारण पुढे करून ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे टीडीएफचा पाठिंबा बेडसे यांनाच असल्याचे टीडीएफचे अध्यक्ष विजय बहाळकर यांनी सांगितले.

Trending