आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलाॅन मांजाने अाजवर घेतले असंख्य बळी, अनेक गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नायलाॅन मांजाने मनुष्यासह पशु-पक्ष्यांनाही माेठा धाेका निर्माण हाेत असल्याचे अाजवर वारंवार स्पष्ट झालेले असतानाही काही महाभाग अशा जीवघेण्या मांजाच्या विक्रीवर भर देताना अाढळून येत अाहे. या मांजाने अाजवर अनेकांच्या अायुष्याची दाेरीच कापली असल्याचे पुढे अाले अाहे. यात विशेषत: लहान बालकांचा समावेश अाहे. 


मकरसंक्रांत जवळ आल्यावर नाशिकच्या गल्लीबोळांत पतंग उडविले जातात. आपली पतंग कटू नये म्हणून बरेचजण तुटणारा नायलॉन मांजा वापरतात. याचा फायदा घेत विक्रेतेही नायलॉन मांजा विकून पैसे कमवितात. मात्र, हा घातक नायलॉन मांजा कुणाच्या जीवास कारणीभूत ठरू शकतो याचा विचारही पतंग उडविणारे विक्रेते करीत नाहीत. नायलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. नायलॉनच्या मांजामध्ये अडकून पाच वर्षांपूर्वी अंबड येथील एका कामगाराचा मृत्यू झाला हाेता. परंतु, तरीही शहरात अशा जीवघेण्या मांजाची सर्रास विक्री हाेत अाहे. या मांजाने राज्यातील अनेकांचा बळी घेतला अाहे. त्यातील काही दुर्दैवी घटना अशा : 


सातारा जिल्ह्यात दाेन मुलांचा नाहक बळी 
सातारा जिल्ह्यातील महादेव केंगार (४५) हे मुलासह तीन महिन्यांपूर्वी बारामती तालुक्यात गेले होते. तेथून परत येत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायलाॅनच्या मांजामुळे ते जखमी झाले. त्यांना मुलाने तत्काळ बारामतीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 


फलटणला बालकाचा मृत्यू 
फलटण येथे १९ अाॅगस्ट २०१५ राेजी मोटारसायकलवरून आई-वडिलांसोबत जात असताना उस्मान शेख (वय ६) या बालकाचा नायलाॅनच्या मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रियाज शेख हे पत्नी दोन मुलांसमवेत मोटारसायकलवरून शहरात आले होते. घटनेवेळी उस्मान मोटारसायकलवर पुढे बसला होता. थांबेपर्यंत मांजाने उस्मानचा निम्मा गळा कापला गेला. रियाज यांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत फार वेळ झाला होता. तेथेच उस्मानच्या गळ्यातून मोठा रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. 


नागपुरात एका कुटुंबाचा अाधार गेला 
गेल्या जानेवारीत नायलॉनच्या मांजाने राहुल नागपुरे या युवकाचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना नागपुरात घडली. दुचाकीवर जात असताना रस्त्यात एका पतंगाचा मांजा त्याला आडवा गेला डोक्यावर हेल्मेट असतानाही त्याचा गळा चिरला गेला. आईसह दोन बहिणींची जबाबदारी राहुलवर होती. मात्र, कुटुंबाच्या एकुलत्या कमावत्या मुलाचा बळी नायलॉनच्या मांजाने घेतला. 

बातम्या आणखी आहेत...