आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आता उत्तर महाराष्ट्रात ‘हल्लाबोल’ आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हल्ला बोल’ अांदाेलन उत्तर महाराष्ट्राकडे वळत आहे. येत्या १५ फेब्रुवारीस अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून त्याला सुरुवात होणार असून, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या २१ जाहीर सभा होणार आहेत. त्यानंतर, १० मार्च रोजी,पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये या आंदोलनाची सांगता करण्यात येणार आहे.  


हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  राज्यातील भाजप-सेना युतीविरोधात विदर्भात हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले. त्यानंतर मराठवाड्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २७ सभा घेऊन आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. आता उत्तर महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात या ‘हल्लाबोल’चा तिसरा टप्पा सुरू होत आहे.   


१५ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता  श्रीगोंद्यातून आंदोलनास सुरुवात होत आहे. शेवगाव, राहुरी, अकोले, कोपरगाव येथे सभा घेऊन राष्ट्रवादीचे नेते नाशिक जिल्ह्यात प्रवेश करतील. त्यानंतर १७ फेब्रुवारीपासून नाशिक जिल्हा, १९ फेब्रुवारीपासून जळगाव जिल्हा  २१ जाहीर सभा होणार आहेत. अखेरीस १० मार्च रोजी नाशिकमध्ये या आंदोलनाची सांगता होत आहे. या आंदोलनात  राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे अावाहन पक्षाने केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...