आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्वत विमानसेवेसाठी 'निमा' देणार तिकीट काउंटरला जागा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दिल्लीसाठी अाता नाशिकहून जेट एअरवेजतर्फे १६८ अासनी विमानाद्वारे जाेडणारी हवाई सेवा मिळणार असली तरी ती टिकविणे हे अाता नाशिककरांपुढील अाव्हान ठरणार अाहे. याकरिता कंपनीने यापूर्वी नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, त्याच अनुषंगाने निमा हाउसमध्ये जेट एअरवेजला तिकीट काउंटरसाठी जागाही उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात अालेली अाहे. 

 

जेटकडून अाॅनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून, प्राथमिक माहितीनुसार १६८ पैकी ६० अासने हे केंद्र सरकारच्या 'उडान' या याेजनेंतर्गत अनुदानित असतील. 


निमाकडून अाकडेवारी संकलित 
नाशिक जिल्ह्यातील जवळपास २५ बड्या उद्याेगांचे प्रतिनिधी नाशिक-दिल्ली प्रवास अनेकवेळा करतात. याची अाकडेवारी निमाने संकलित केली असून, या बड्या उद्याेग समूहांची याच सेवेच्या अनुषंगाने लवकरच निमा हाउस येथे बैठक बाेलविण्यात येणार अाहे. यात, या सेवेकरता पाठपुरावा करणारे खासदार हेमंत गाेडसे यांचेही मार्गदर्शन मिळणार असल्याचे निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी सांगितले. 


उर्वरित शहरांना लवकरच सेवा 
'उडान २' च्या टप्प्यामध्ये नाशिक-गाेवा, नाशिक-हैदराबाद, नाशिक-बंगळुरू, नाशिक-हिंडन (दिल्ली), नाशिक-भाेपाळ अशा शहरांकरिता स्पाइस जेट, इंडिगाे, ट्रु जेट अशा कंपन्यांकडून सेवा मिळणार अाहे. सूत्रांच्या माहितीनुसार याेजनेतील दिशानिर्देशांनुसार ३१ जूनपूर्वी ही सेवा सुरू हाेणे अपेक्षित अाहे. त्यामुळे येत्या अाठवड्यात इतर काही कंपन्याही अापल्या सेवेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता अाहे. हिंडनकरिता मात्र पुढील सहा महिने तरी सेवा शक्य हाेणे सुरू नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...