आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपदाची निवडणूक लढविलेल्या साहित्यिकांना संमेलनाचे निमंत्रण नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बडाेदा येेथे हाेत असलेले ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ताेंडावर अालेले असताना या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविलेल्या इतर उमेदवारांना अद्यापही निमंत्रणच पाेहाेचलेले नाही. निमंत्रणच नाही तर संमेलनाला कसे जायचे? असा प्रश्न या साहित्यिकांनी केला अाहे.   

संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख हे निवडून अाले. मात्र, याच निवडणूक प्रक्रियेत नागपूरचे रवींद्र शाेभणे, वर्ध्याचे किशाेर सानप, पुण्याचे रवींद्र गुर्जर अाणि राजन खान हेदेखील निवडणूक लढवत हाेते. या चाैघांचा जरी पराभव झाला तरी ते ज्येष्ठ साहित्यिक अाहेत. या नात्याने त्यांना संमेलनाचे अादरपूर्वक निमंत्रण मिळायला हवे हाेते, असा एक सूर साहित्य वर्तुळात उमटत अाहे. यापैकी गुर्जर यांना व्हाॅट्सअॅपवर निमंत्रण मिळाले अाहे. ते सध्या द्वारकेत असल्याने त्यांना पाेस्टाने निमंत्रण मिळाले की, नाही ते माहिती नाही. पण ते संमेलनाला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाेभणे यांनी मात्र निमंत्रणच मिळालेले नाही. त्यामुळे मी जाणार नसल्याचे स्पष्ट केले अाहे. तर राजन खान व सानप यांनाही अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले.  

हे संमेलन म्हणजे सांस्कृतिक जलसा नाहीतर गॅदरिंग म्हणा
हे संमेलन म्हणजे सांस्कृतिक जलसाच हाेणार अाहे, त्यातून काय अपेक्षा ठेवणार?  शाेभणे यांनी मराठी वाङ्मय परिषदेला पत्र पाठवून सर्व उमेदवारांना निमंत्रण देऊन त्यांचाही सन्मान करावा, असे नमूद केले हाेते. त्यावर महामंडळाने असा नियम नसल्याचे सांगितले, तर बडाेदा मराठी वाङ‌्मय  परिषदेने पत्राची दखलच घेतलेली नाही. या लाेकांना फक्त एक साेहळा करायचा अाहे साहित्याशी काहीही संबंध नाही. कार्यक्रमांचे स्वरूपही  खालच्या दर्जाचे अाहे. 
- किशाेर सानप, संत साहित्याचे अभ्यासक   

बातम्या आणखी आहेत...