आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्व दाखला मिळेना, वैद्यकीय अधिकाऱ्यांना काेंडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जुन्या नाशकातील कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रूग्णालयात अपंगत्व दाखला देण्याची सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, या केंद्रात डॉक्टराची नेमणूकच केली नसल्याने अंपगांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे. केंद्रात केवळ आस्थिरोग तज्ज्ञ व नेत्रराेगतज्ज्ञ नियुक्त केले आहेत. यामुळे रुग्णालयात येणाऱ्याा अपंग व्यक्तींची हेडसांळ होत असल्याची तक्रार करत गुरुवारी(दि. २१) प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अपंग व्यक्तींकडून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोंडून रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 


जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी आणि शुक्रवारी अपंगत्व दाखला देण्याची प्रक्रिया असते. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी हाेत असते. मात्र, राज्य सरकारने अपंग दाखला देण्याचे अधिकार महापालिकेला दिल्याने नाशिकरोड भागातील बिटको रुग्णालय व जुन्या नाशकातील कथडा भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अपंगत्वाचा दाखला देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात अाली अाहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दाखविण्यासाठी घाईघाईत सुरु केलेले अपंगत्व दाखला केंद्र केवळ शोभेचेच ठरले अाहे. या केंद्रासाठी लागणाऱ्या डाॅक्टर्सबाबत कुठलेही नियाेजन केलेले नाही. या केंद्रातून अाता प्रमाणपत्र वितरण बंद असल्याची तक्रारी अपंगांकडून केली जात आहे. केंद्रात केवळ आस्थिरोग तज्ज्ञ आणि नेत्रतज्ज्ञ असल्यामुळे अनेक रुग्णांना प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागत आहे. यामुळे अपंग दाखल्यासाठी चकरा कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...