आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकप्रतिनिधींनी केलेले १७०४ जागांचे ठराव रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सुशिक्षित बेराेजगारांसह अापल्या कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी महापालिकेच्या जागेवर त्यांना राेजगारासाठी जागा देण्याचे अनेक लाेकप्रतिनिधींनी केलेले १७०४ ठराव रद्द करण्याचे अादेश अायुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले अाहेत. अाहेत. हाॅकर्स झाेन व रस्त्यावर हाेणाऱ्या अतिक्रमणाच्या कारणास्तव हे अादेश काढण्यात अाले अाहेत. त्यामुळे एकीकडे लाेकप्रतिनिंधींना पुन्हा एकदा दणका बसला असला तर दुसरीकडे अशा जागांवर व्यवसाय करणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण हाेणार अाहे. 

 

महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयातील संगणकीय नाेंदीनुसार सन २००५-२००६ ते २०१७ -२०१८ या कालावधीत १७०४ ठराव मंजूर करण्यात अाले अाहेत. त्यापैकी फक्त ११ ठरावांना अधिकृत जागा देण्यात अालेली अाहे. उर्वरीत ठरावांपैकी ज्याच्या त्याच्या परीने व्यवसाय थाटण्यात अाले अाहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेवर टपरी ठेवण्याबाबत मनपाच्या मंजूर विकास व नियंत्रण प्राेत्साहनपर नियमावलीत काेणतीही तरतूद नसल्याच्या कारणामुळे हे ठराव रद्द करण्यात अाले अाहेत. यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर अशी प्रकरणे निकाली काढण्याचे अादेश अतिक्रमण उपायुक्तांनी काढले अाहेत. विशेष म्हणजे, ज्या ११ ठरावांवर अधिकृत कारवाई झाली त्यांचीदेखील मुदत संपल्याने त्या जागाही ताब्यात घेण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. 


दरम्यान, शहरात अद्यापही हाॅकर्स झाेनचे भिजत घाेंगडे कायम असताना एवढ्या माेठ्या संख्येने व्यवसाय करणाऱ्यांवर पुन्हा बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळणार असल्याने करवाढीप्रमाणे या मुद्द्यावरूनही महापालिकेत अायुक्त विरुद्ध लाेकप्रतिनिधी असा संघर्ष हाेण्याची चिन्हे दिसू लागली अाहेत. 


रस्त्यावरील अतिक्रमणांबाबत नेहमीच हाेत्या तक्रारी 
वाहतुकीच्या नियाेजनासंदर्भात महापालिका व पाेलिस अधिकारी यांच्या नेहमी बैठका घेतल्या जातात. या बैठकांमध्ये पाेलिसांकडून अतिक्रमित टपऱ्यांचा विषय नेहमीच घेतला जात हाेता. मात्र, महापालिकेच्या ठरावामुळेच या टपऱ्या थाटण्यात अाल्याने त्यावर कारवाई हाेत नव्हती. अायुक्तांनी या तक्रारींचीही दखल घेऊन ही कारवाई केल्याचे बाेलले जात अाहे. 


हाॅकर्स झाेन करा, नंतरच निर्णय घ्या 
टपरीधारक व हाॅकर्स ही प्रत्येक शहराची गरज अाहे. सर्वच लाेक माॅलमध्ये जात नाहीत. महापालिका प्रशासनाने अगाेदर हाॅकर्स झाेन तयार करून या विक्रेत्यांचे पुर्नवसन करावे अाणि नंतरच निर्णय घ्यावा. - अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेता, मनपा 


राेेजगारापासून वंचित करू नये 
स्थायी समितीने बेराेजगारांना राेजगार उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेला विनंती करून ठराव केले अाहेत. ठराव झालेल्या सर्वांना हाॅकर्स झाेनमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी. - सलीम शेख, गटनेता, मनसे 

बातम्या आणखी आहेत...