आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करवाढीविराेधात 'हल्लाबाेल'साठी शिवसेना बांधणार विराेधकांची माेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- १८ वर्ष काेणतीही करवाढ झाली नसल्याचे कारण देत सत्तारूढ भाजपने अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या सुरात सुर मिसळत निवासी क्षेत्रात ३३ टक्के तर वाणिज्य व उद्याेगांची कमरताेड घरपट्टी वाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने अाता काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, मनसेसह अन्य विराेधी पक्ष, सामाजिक संघटनांची माेट बांधत हल्लाबाेल निदर्शने करण्याची रणनिती अाखली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी शनिवारपासून सर्व विराेधी पक्षातील नेत्यांची भेट घेवून कशा पद्धतीने रस्त्यावर उतरायचे याचे नियाेजन करण्याचा पवित्रा घेतला अाहे. 


मंगळवारी झालेल्या महासभेत सत्तारूढ भाजपने पुर्वी १८ टक्के घरपट्टी वाढीचा असलेला प्रस्ताव अचानक अायुक्तांच्या सुधारीत प्रस्तावाच्या नावाखाली दुपटी, तिपटीने वाढवला. परिणामी निवासी क्षेत्रात ३३, वाणिज्यमध्ये ६४ तर उद्याेग क्षेत्रासाठी तब्बल ८२ टक्के करवाढ लादली गेली. त्यासह शिवसेनेसह सर्वच विराेधी पक्षांनी जाेरदार विराेध केला. खुद्द अायुक्त मुंढे हेच वाढीसाठी जाहीरपणे महापाैरांवर दबाववजा विनंती करू लागल्यामुळे हतबल विराेधकांनी 'नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी' अशा घाेषणा देत सभात्याग केला. विराेधकांच्या एल्गारानंतरही सत्ताधारी भाजपने घरपट्टी वाढीला मंजुरी दिली. परिणामी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराला इतिहासात प्रथमच माेठ्या करवाढीचा सामना करावा लागणार असल्यामुळे हीच का परतफेड अशा तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. अाैद्याेगिक संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून कसे उद्याेग येणार अशी चिंता व्यक्त केल्यामुळे भाजप अाता करवाढीची टक्केवारी कमी करण्याच्या मनःस्थितीत अाला अाहे. 


इकडे, माकप व काॅंग्रेसने निर्दशने सुरू केली असून राष्ट्रवादीने २३ फेब्रुवारीपासून विभागीय कार्यालयांवर माेर्चा काढण्याची रणनिती अाखली अाहे. अाता या सर्वात महासभेत ठरल्याप्रमाणे शिवसेनेने पुढाकार घेत सर्वपक्षीयांची माेट बांधत एकत्रित निषेधाची तयारी सुरू केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून विराेधी पक्षनेते बाेरस्ते यांनी शनिवारपासून माकप नेते डाॅ. डी. एल. कराड, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनसे शहराध्यक्ष अनिल मटाले यांच्याशी चर्चा करून रणनिती ठरवणार अाहे. माजी उपमहापाैर गुरुमित बग्गा हे पक्षविरहीत अन्य नाराजांची माेट बांधणार अाहेत. 


करवाढीसाठी भाजप दबावाखाली
महासभेत करवाढ मान्य नसतानाही भाजपचे पदाधिकारी वा नगरसेवक उघडपणे विराेध करू शकले नाही. त्यामुळे भाजपवर काेणाचा तरी दबाव हाेता. हा दबाव नेमका काेणाचा असा प्रश्न करीत दबाव झुगारून भाजपने करवाढ मागे घ्यावी, असेही अावाहन त्यांनी केले.

 
शिवसेना करणार कायदेशीर अभ्यास
अायुक्तांनीच ठेवलेला अाणि स्थायी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावात सुधारणेच्या नावाखाली महासभेत पाठवण्यापुर्वी झालेले फेरबदल कायदेशीर अाहेत का याचाही अभ्यास शिवसेनेने सुरू केला अाहे. रस्त्यावर अाणि कायदेशीर अशा दाेन्ही पद्धतीने करवाढ राेखण्यासाठी प्रयत्न हाेतील असेही बाेरस्ते यांनी स्पष्ट केले. 


नाशिककर म्हणून भाजपलाही अामंत्रण देणार 
करवाढीविराेधात नाशिककर नाराज असून भाजपकडून जरी प्रस्ताव मंजूर असला तरी, याच पक्षाचे अनेक नगरसेवक निर्णयाविराेधात असल्याची चर्चा अाहे. या पार्श्वभुमीवर भाजप शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवकांनाही निषेध अांदाेलनात सहभागी करून घेतले जाईल असेही बाेरस्ते यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...