आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचा 'डाव'; गृहितकांवर घाव; राज्यात ६ जागांसाठी अाज मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा अधिकृत उमेदवार नसताना अाणि या पक्षाने काेणाला समर्थन देण्याची भूमिकाही जाहीर केलेली नसताना मतदानाच्या अादल्या रात्री महामार्गावरील एका अलिशान हाॅटेलमध्ये पक्षाने अापल्या मतदार सदस्यांची बैठक घेत अाश्चर्याचा धक्का दिला. हुकमी एक्क्याची भूमिका बजावणाऱ्या भाजपने अखेरपर्यंत पत्ते उघड केले नसले तरी राष्ट्रवादीला अापली पाने दाखविल्याची चर्चा मात्र या बैठकस्थानी सुरु हाेती. या वेळी विभागीय संघटनमंत्री किशाेर काळकर यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन काेणाला मतदान करायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिल्याचे कळते. त्यामुळे विधानपरिषदेचा 'डाव' अाता नेमका काेणाला लागताे याबाबत अाैत्सुक्य निर्माण झाले अाहे. शिवसनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी नाशिकमध्ये अादल्या रात्री तळ ठाेकत राजकीय हालचालींना वेग दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली अाहे. 


दरम्यान, राज्यात नाशिकसह ६ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक विधानपरिषद निवडणुकीसाठी तालुकानिहाय बैठक घेताना विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर. शेजारी माजी आमदार माणिक कोकाटे, वसंत गिते, आमदार बाळासाहेब सानप, दिनकर पाटील आदी. साेमवारी (दि. २१) हाेत अाहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडणुकीबाबत वेगवेगळे गृहीतके राजकीय व्यासपीठावरून मांडली जात हाेती. या निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या उमेदवाराबराेबर राहताे की अाघाडीच्या उमेदवाराबराेबर की तटस्थ राहताे याबाबत गेल्या पंधरा दिवसांपासून तर्कवितर्क लढविले जात हाेते. पालघर लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असतानाही शिवसेनेने अापला उमेदवार उभा केल्याने विधान परिषदेचेही समीकरणे बदलली. मात्र भाजपने अखेरच्या दिवसापर्यंत अापली भूमिका गुलदस्त्यात ठेवत निवडणुकीतील 'सस्पेन्स' कायम ठेवला हाेता. शिवसेनेच्या बड्या नेत्यांबराेबर मुंबईत भाजपच्या वरिष्ठांशी गुफ्तगू झाल्याची चर्चा असताना या बैठकीतून साध्य मात्र काही झाले नसल्याचे बाेलले गेले. 


दुसरीकडे भाजपच्या मतदार सदस्यांना महामार्गावरील ज्युपिटर हाॅटेलमध्ये निमंत्रित करुन भाजपने निवडणुकीतील अाैत्सुक्य अधिक वाढविले. यावेळी उपस्थित पदाधिकारी अापापल्या गटातील पदाधिकाऱ्यांबराेबर कानगाेष्टी करताना दिसत हाेते. पालकमंत्री गिरीश महाजन हे रात्री ८.३० च्या सुमारास भाजप काेणाच्या पाठीशी उभा राहणार याबाबत भूमिका स्पष्ट करतील असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगितले गेले. प्रत्यक्षात रात्री ९ वाजेच्या सुमारास किशाेर काळकर यांचे बैठकस्थानी अागमन हाेऊन त्यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन अापली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांना मतदान करण्याचा संदेश पक्षाने दिला असल्याचे बहुसंख्य नगरसेवकांनी 'दिव्य मराठी'शी बाेलतांना सांगितले. मात्र याबाबत अधिकृत घाेषणा करण्यात अाली नाही. 


मला अामदार झाल्यासारखं वाटतंय 
निवडणुकीविषयी बाेलताना शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अाघाडीचे अॅड. शिवाजी सहाणे अाणि अपक्ष परवेज काेकणी यांनी 'मला अामदार झाल्यासारखं वाटतंय' अशीच प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाने विजयावर दावा करीत काेणत्याही परिस्थितीत अामदार मीच हाेणार असा दावा केला. सहाही विधान परिषदेतील शिवसेनेच्या उमेदवारांपैकी नाशिकचा उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचे शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी सांगितले. 


पक्षीय बलाबल 
शिवसेना- २०७, भाजप- १६७, राष्ट्रवादी- १००, काँग्रेस- ७१, मनसे- ६, बसप- १, अारपीअाय-५, एअायएम- ७, जनता दल- ६, शहर विकास अाघाडी - १८, जनशक्ती पॅनल- ५, माकप- १३, अपक्ष ३७ 
>एकूण मतदान ६४४ 
>जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो उपजिल्हाधिकारी दालन तसेच १४ तालुक्यांतील तहसील कार्यालयांत मतदान केंद्र 


चुप्पी का साधली? 
पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमाेर मांडल्यास जेथे भाजप अाणि शिवसेना एकत्रितपणे निवडणुका लढवित अाहे तेथे परिणाम हाेऊ शकताे, असे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी खासगीत बाेलताना सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार बैठकस्थानी येऊन मतदारांशी संवाद साधतील असेही नियाेजन करण्यात अाले हाेते. प्रत्यक्षात हे नियाेजनही रात्री उशिरा रद्द झाले. 

बातम्या आणखी आहेत...