आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पा घरी लवकर या, काही राग असेल तर अामच्यावर काढा, पाटील यांच्या मुलांची अार्त हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - 'पप्पा तुम्ही लवकर घरी या.. अाम्ही तुमची वाट पाहताेय... काही राग असेल ताे अामच्यावर काढा, पण असे रागावून अाम्हाला साेडून जाऊ नका... ' महापालिकेतील बेपत्ता अभियंता रवींद्र पाटील यांच्या मुलांची ही अार्त हाक... वडील बेपत्ता झाल्यापासून मुलगा जय, मुलगी भाग्यश्री, पत्नी, अाई, भाऊ,   अन्य नातेवाईक अाणि मित्रपरिवार पाटील यांची अातुरतेने वाट बघत अाहे. तब्बल ४० तास उलटल्यानंतरही रवींद्र घरी परत न अाल्याने त्यांची काळजी वाढली अाहे. 

 

कामाचा ताण सहन न झाल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पाटील हे शनिवारी (दि. २६) सकाळी ६ वाजेपासून घर साेडून बेपत्ता झाले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या गाडीत अात्महत्या करीत असल्याची चिठ्ठी अाढळून अाली अाहे. या प्रकरणी गंगापूर राेड पाेलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात अाली अाहे. पाेलिसांची शाेध माेहिम एका बाजूने सुरु असतांना दुसरीकडे पाटील यांचे कुटुंबिय व मित्रपरिवारही त्यांचा युध्दपातळीवर शाेध घेत अाहेत. त्यासाठी साेशल मीडियावर पाेस्ट व्हायरल करण्यात अाल्या अाहेत. नातेवाईकांना याबाबत माहिती देत अापापल्या गावी त्यांचा शाेध घेण्याचे निराेप पाेहचविण्यात अाले अाहेत. रवींद्र बेपत्ता झाल्यापासून त्यांची पत्नी शितल व अाई कमालीच्या खचल्या असून त्या अश्रू राेखू शकलेल्या नाहीत. चाैथीतील चिमुरडा जय हा पप्पांचा फाेटाे हातात घेऊन त्यांची अातुरतेने वाट बघताेय. तर दहावीत असलेली त्यांची मुलगी भाग्यश्री ही सर्वच नातेवाईकांशी संपर्क साधून अापल्या वडिलांचा शाेध घेण्याची अार्त हाक देत अाहे. पप्पांनी हवा तर अामच्यावर राग काढावा, पण त्यांनी लवकर परत यावे, असेही ती वारंवार अापल्या अाई अाणि अाजीला सांगत अाहे. दरम्यान, पाेलिसांनी तपासासाठी तीन पथके स्थापन केली अाहेत. बहुचर्चित ग्रीन फिल्ड लाॅन्सच्या वाढीव बांधकामाचे प्रकरणही पाटील हेच हाताळत असल्याने त्याचा बेपत्ता हाेण्याशी काही संबंध अाहे का, याचा तपास पाेलिस घेत अाहेत. 


सर्व लक्ष एटीएम वापरावर 
पाटील यांनी घर साेडून जाताना अापला माेबाइल घराजवळ उभ्या केलेल्या अापल्या कारमध्येच ठेवला. त्यांच्याबराेबर माेबाइल असता तर लाेकेशनच्या अाधारे त्यांचा शाेध घेणे शक्य हाेते. परंतु माेबाइलच बराेबर नसल्याने माेठ्या अडचणी निर्माण झाल्या अाहेत. त्यांच्या पाकिटात एटीएम कार्ड अाहेत. या कार्डवरून रक्कम काढली तर माेबाइलवर त्याविषयी माहिती येऊन ट्रॅकिंग करता येईल, असे पाेलिसांनी सांगितले. 


मित्र म्हणतात, अाम्ही तुझ्या पाठीशी अाहाेत 
रवींद्र पाटील यांच्या मित्रपरिवाराने साेशल मीडियावर टाकलेल्या पाेस्टमध्ये म्हटले अाहे की, ' रवी तू लवकर परत ये. अाम्ही सर्व तुझ्या साेबत अाहाेत व खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे अाहाेत. ' 
कर्मचारी संघटना अांदाेलनाच्या तयारीत 
तुकाराम मुंढे यांनी अायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामाचा तणाव वाढल्याचे कर्मचारी वर्गाकडूनच सांगितले जात अाहे. मुंढे यांच्या कार्यपध्दतीच्या विराेधात म्युनिसिपल कर्मचारी सेना अांदाेलनाच्या तयारीत अाहे. मात्र साेमवारपासून ते रजेवर जात असल्याने अांदाेलनाचे स्वरुप कसे असावे हे ठरविले जात अाहे. 

बातम्या आणखी आहेत...