आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्यरात्री फाेन केला म्हणून पालिका नर्सेस सेवेतून कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेच्या वादग्रस्त पंचवटी येथील मायकाे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व नर्सच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेची रिक्षात झालेल्या प्रसूतीमुळे वैद्यकीय विभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्याची घटना ताजी असताना गेल्या महिन्यात एका गंभीर प्रसूतीसाठी मध्यरात्रीनंतर डाॅक्टरांना फाेन केल्याचा राग येऊन संबंधितांनी चारही नर्स अर्थातच परिचारिकांविराेधात अभिप्राय देत त्यांना सेवेतून कमी करण्यास भाग पाडल्याची तक्रार पीडितांनी महापाैर रंजना भानसी यांच्याकडे केली. महापाैरांनी तत्काळ वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राजेंद्र भंडारी यांना पाचारण करीत जाब विचारल्यानंतर या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून कारवाईचे अाश्वासन त्यांनी दिले. 

 

महापालिकेच्या रुग्णालयांचा कारभार अनेक वर्षांपासून वादात असून, संबधित मायकाे रुग्णालयात गेल्या वर्षी डाॅक्टर चक्क विनापरवानगी रजेवर असल्यामुळे तसेच येथील परिचारिकांसह अन्य स्टाफ स्वत:च्या मर्जीप्रमाणे सेवा करीत असल्यामुळे एका गर्भवतीला रिक्षात प्रसूत हाेण्याची वेळ अाली. या प्रकरणानंतर महापालिका रुग्णालयांची माेठ्या प्रमाणात बदनामी झाली. तत्कालीन अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी त्याची दखल घेत या प्रकरणाची चाैकशी लावली. त्यास अाताचे अायुक्त तुकाराम मुंढे यांनी अंतिम रूप देत या प्रकरणात अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या डाॅ. हिरामण काेकणी यांच्या सेवानिवृत्ती वेतनातील मासिक शंभर रुपये कपातीची शिक्षाही ठाेठावली अाहे. दरम्यान, अाता याच मायकाे रुग्णालयात गेल्या महिन्यात एका गर्भवती महिलेची प्रसूतीवरून मध्यरात्री डाॅक्टरांना केलेल्या फाेनवरून थेट सेवेतून कमी करण्याची बाब चर्चेचा विषय ठरली अाहे. यातील एका पीडित परिचारिकेने महापाैरांकडे धाव घेत अापली कैफियत मांडली. गंभीर अवस्थेतील गर्भवतीची डाॅक्टरांनी पूर्णत: तपासणी करून ते घरी गेले हाेते. मात्र, मध्यरात्रीनंतर प्रकृती खालावू लागली. नातेवाइकांकडून डाॅक्टरांना बाेलवा असा अाग्रह सुरू झाला. 
 
अायांना साेबत घेऊन प्रसूती 
महापाैरांसमवेत संबंधित नर्सने भावूक अवस्थेत मागील काही अनुभव कथन केले. या ठिकाणी येऊन फार दिवस झालेले नाही. अनेकवेळा डाॅक्टर नसताना गंभीर अवस्थेतील गर्भवतींच्या अायांनासाेबत घेऊन प्रसूती केल्या. त्याचे काैतुक हाेत नाही, मात्र एखाद्यावेळी दुर्घटना घडली तर किती माेठा अनर्थ हाेईल या भीतीने कायम ग्रासलेले असते याकडे लक्ष वेधले. 

बातम्या आणखी आहेत...