आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीप तर साेडा, नाशिकचे पालकबमंत्रीच गायब; 'लक्ष्मी'दर्शनामुळे सर्वपक्षीय नेते झाले घामाघूम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानासाठी शिवसेनेचे नगरसेवक व उमेदवार नरेंद्र दराडे एकत्रित येताना. - Divya Marathi
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानासाठी शिवसेनेचे नगरसेवक व उमेदवार नरेंद्र दराडे एकत्रित येताना.

नाशिक- शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपने कथितरित्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी, नाशिकसाठी सर्वेसर्वा असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी फिरवलेली पाठ, व्हीप अर्थातच भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास दिलेले समर्थन या बाबी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात दिवसभर चर्चेचा विषय ठरल्या हाेत्या. दुसरीकडे, सकाळी साडेअाठ वाजता विधान-परिषदेसाठी मतदान सुरू झाल्यानंतर दुपारी १२ ते २ या कालावधीत मतदारांना केंद्रापर्यंत अाणण्यात सर्वपक्षीय नेतेच घामाघूम झाल्याचे चित्र त्यामागे लक्ष्मीदर्शनाच्या प्रयाेगातील चढ उतार कारणीभूत ठरल्याचा एकत्रित सूर व्यक्त हाेत हाेता. 


निवडणुकीच्या दिवशी साेमवारी सकाळपर्यंत बदलत्या राजकीय समीकरणामुळे विधानपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचे चित्र हाेते. सकाळी साडेअाठ वाजता जरी मतदानाचा कालावधी सुरू झाला तरी, प्रत्यक्षात मतदार मात्र, साडेअकरा वाजेनंतर येण्यास सुरूवात झाली. इकडे सर्वात माेठे मतदान केंद्र असलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांच्याअाधीच कार्यकर्तेच तळ ठाेकून हाेते. जणू काही त्यांच्यात शक्तिप्रदर्शनासाठी चढाअाेढ सुरू हाेती. 


काँग्रेस-मनसेही अाले एकत्र 
राष्ट्रवादी काँग्रेसबराेबरच काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच नगरसेवकही एकत्रितरित्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानासाठी अाले. यावेळी काँग्रेस गटनेते शाहू खैरे, शहराध्यक्ष शरद अाहेर, हेमलता पाटील, डाॅ. शाेभा बच्छाव यांच्यासह मनसेचे महानगरप्रमुख अनिल मटाले, माजी महापाैर अशाेक मूर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख हेही उपस्थित हाेते. 


राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अाधी; मतदार मात्र शेवटी दाखल 
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वप्रथम राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते दाखल झाले हाेते. शिवाय पदाधिकारीही उपस्थित हाेते. खुद्द उमेदवार शिवाजी सहाणे यांनीही सकाळपासूनच तळ ठाेकला हाेता. भारतीय जनतापक्षाचेे मतदार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अावारात दाखल झाल्यानंतर अॅड. सहाणे यांनी सर्वच मतदारांचे स्वागत केले. पुढे शिवसेनेच्या मतदारांना 'जय महाराष्ट्र' करीत काॅंग्रेस राष्ट्रवादी अाघाडीचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांनी जुन्या संगतीसाेबतीची अाठवण करून देत लक्ष राहू द्या, अशीही विनवणी मतदान करण्यासाठी त्यांनी केली. 


शिवसेना स्टाईल नगरसेवकांची धडक 
शिवसेनेचे मतदार पाथर्डी परिसरातील एका हाॅटेलमधून दीड वाजता अाले. भाजपचे मतदार येऊन गेल्यानंतर शिवसेनेचे नाशिकमध्ये असूनही काय येत नाही असा प्रश्न हाेता. दरम्यान, शिवसेना लक्ष्मीदर्शनाच्या प्रयाेगात ग्रामीण भागातील मतदारांची अधिक काळजी घेत असल्याचा मुद्दा असल्याची चर्चा हाेती. मात्र, मतदारांच्या सर्व शंका कुशंका दूर झाल्यानंतर त्यांना बसद्वारे मतदान केंद्रांवर अाणण्यात अाले. याठिकाणी संपर्कप्रमुख अजय चाैधरी, विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, बबन घाेलप उपस्थित हाेते. 


हे नेते निवडणुकीपासून दूरच 
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीपासून काही पक्षांचे वरिष्ठ नेते थाेडे दूर दूरच राहत असल्याचे दिसले. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदान केंद्र हे या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी हाेते. याठिकाणी मात्र, भारतीय जनता पत्क्षाच्या नाशिक पश्चिमच्या अामदार देवयानी फरांदे वा सीमा हिरे यांची अनुपस्थिती दिसून अाली. शिवसेनेचे खासदार हेमंत गाेडसे, देवळाली मतदारसंघातील अामदार याेगेश घाेलप हेही अनुपस्थित हाेते. या निवडणुकीत प्रत्येक पक्षात मतभेद वा फाटाफूट असल्यामुळे उगाच राजकारणात न पडण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची चर्चा हाेती. 


सर्व नेत्यांचा दावा; आम्ही जिंकणार 
पालघर लाेकसभेच्या जागेवरून भारतीय जनता पक्ष व शिवसेना पक्षात फिसकटल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपने एेनवेळी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचाच उमेदवार निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. 


वरिष्ठांच्या आदेशाने राष्ट्रवादीस पाठिंबा 
पालघर निवडणुकीत शिवसेनेने काय केले हे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशानेही पाहिले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार आता आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. आमचे उमेदवार निवडून येतीलच. 
- बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष 


माझा विजय निश्चित 
मला पक्षाने उमेदवारी दिली. त्याबद्दल मी पक्षाचा आणि सर्वच नेत्यांचा अाभारी आहे. शिवाय पक्षाने केलेली निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि भाजपसह अपक्षांच्या लाभलेल्या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्चित आहे. 
- अॅड. शिवाजी सहाणे, उमेदवार, राष्ट्रवादी 


युती-आघाडीची गणिते बदलतातच 
आघाडीसोबत भाजप आल्याने नक्कीच या निवडणुकीत चमत्कार घडेल. आमचा उमेदवार सक्षम आहे. निवडणूक रणनीतीनुसार काम सुरू असून त्या सत्यात उतरत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभेत हेच धोरण कायम असेल असे नाही. ते राजकीय परिस्थितीनुसार बदलत असते. 
- राजेश टोपे, माजी मंत्री, राष्ट्रवादी 


अखेरपर्यंत भाजपेयींची घुळघुळ सुरूच 
प्रथम भाजपचे मतदार केंद्रांवर अालेे. मच्छिंद्र सानप यांनी चार नगरसेवकांसह सर्वप्रथम मतदान केले. यावेळी सहाणे यांच्यासमवेत फाेटाेसेशनही केले. भाजपचे नगरसेवक केंद्रावर अाले. पुरूष नगरसेवकांनी प्रथम मतदान केले. मात्र, लक्ष्मीदर्शनासाठी काही जण हटून बसले. गटनेते माेरूस्कर व दिनकर पाटील यांनी समजूत काढल्यानंतर मतदान केले. नगरसेविका पतीराजांशी सल्ला घेऊनच केंद्रांकडे जात हाेत्या. महापाैर भानसी, हिमगाैरी अाडके इतरांच्या मतदानाची खात्री झाल्यानंतर मतदान केले. 


आमच्याकडे विजयी हाेण्याचे संख्याबळ 
विधानपरिषदेसाठी झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सध्या काय खेळी करतेय हे माहीत नाही. परंतु, दराडे निवडून येण्यासाठी मतदारांचे संख्याबळ आमच्याकडे आहे. आम्हीच निवडून येणार. 
- भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख, शिवसेना 

बातम्या आणखी आहेत...