आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका अायुक्तांचा अाज भल्या पहाटे जनता दरबार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नवी मुंबईच्या धर्तीवर महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांचा नाशिककरांच्या समस्या साेडवण्यासाठी 'वाॅक विथ कमिशनर' हा उपक्रमाच्या माध्यमातून जनता दरबार शनिवारी (दि. २१) भल्या पहाटे पार पडणार अाहे. करवाढीमुळे धुमसत असलेल्या नाशिककरांकडून मुंढे यांना कसा प्रतिसाद मिळताे याकडे लक्ष लागले असून सत्ताधारी भाजपला समांतर सत्ताकेंद्र म्हणून चर्चेत असणाऱ्या या उपक्रमाकडे अाता सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले अाहे. 

 

महापालिकेत भाजपची फेब्रुवारी २०१७ मध्ये सत्ता अाल्यानंतर एकांगी व वादग्रस्त निर्णयाने वर्षभर पक्षाची पुरती बदनामी झाली. त्यातून 'दत्तक नाशिक' घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभार सुधारण्यासाठी मुंढे यांची नियुक्ती केली. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय शिस्त लावण्याबराेबरच सत्ताधाऱ्यांना जाेरदार दणके दिल्यामुळे काही काळात ते लाेकप्रिय झाले; मात्र दत्तक नाशिकचा अजेंडा राबवताना नाशिककरांच्या खिशातून उत्पन्नाचे इमले उभे करण्यासाठी अन्यायकारक करवाढ लादल्यामुळे अल्पावधीतच विराेधाचे वातावरण तयार झाले. शहरात एकरी प्रथम एक लाख ३७ हजार व विराेधानंतर ६५ हजारांपर्यंत घरपट्टी लागू हाेणार असल्यामुळे शेतकऱ्यांसह नाशिककर अाक्रमक झाले अाहेत. 


करवाढीचा जाब विचारला जाण्याची शक्यता 
करवाढीवरून अाक्रमक असलेल्या शेतकऱ्यांसह नाशिककर या उपक्रमात हजर राहून जाब विचारण्याची शक्यता अाहे. त्यामुळे येथे माेठी गर्दी हाेण्याची शक्यता अाहे. नगरसेवकांसह लाेकप्रतिनिधीही तेथे येण्याची शक्यता अाहे; मात्र त्यांना व्यासपीठावर स्थान नसेल तसेच सामान्य नागरिक बनून प्रश्न विचारावा लागेल. 


असा अाहे उपक्रम 
सकाळी साडेसहाला मुंढे प्राप्त तक्रारी वा प्रश्नांना क्रमांकानुसार उत्तरे देतील. त्यांच्यासाेबत पालिकेचे खातेप्रमुख तसेच विभागीय कार्यालयातील प्रमुख त; अन्य खातेप्रमुखही असतील. प्रश्न मांडण्यासाठी सकाळी सहाला नियाेजित ठिकाणी येऊन नागरिकांना टाेकन घ्यावे लागेल. टाेकन असलेल्यांनाच चर्चेत सहभाग घेता येईल. या उपक्रमासाठी छाेटे व्यासपीठ, माइक व हाेर्डिंग्ज लावले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...