आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीतील अनावश्यक कामांनाही मुंढेंची त्रिसूत्री; प्रकल्पांची निकड तपासण्याची सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सत्ताधारी भाजपकडून तरतूद वा गरज नसलेल्या काेटीच्या काेटी कामांना ब्रेक लावण्यासाठी नवनिर्वाचित अायुक्त तुकाराम मुंढे यांची त्रिसूत्री अाता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट सिटी अभियानांसाठी लागू हाेणार अाहे. साेमवारी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांच्यासमवेत झालेल्या अाढावा बैठकीत मुंढे यांनी स्मार्ट सिटीतील प्रकल्पांचीही निकड, निधीच्या उपलब्धतेचे स्त्रोत आणि यशस्वी अंमलबजावणीतील शक्यता तपासण्याची तंबी दिली अाहे. जेणेकरून जी कामे शक्य असतील तीच हाेतील, असा उद्देश असल्यामुळे निधी खर्चासाठी उगाच घुसडलेल्या स्मार्ट कामांना ब्रेक लागण्याची शक्यता अाहे. 


स्मार्ट सिटीत निवड झालेल्या नाशिक महापालिकेला मूळ अाराखडा व अाता सुरू असलेल्या कामांतील तफावतीमुळे टीकेचा सामना करावा लागत अाहे. संपूर्ण शहर स्मार्ट करण्याएेवजी गरज नसलेली कामेच स्मार्ट करून कशीबशी याेजना राबवण्याचे प्रयत्न सुरू अाहे. गावठाणाला चार एफएसअाय देऊन संपूर्ण कायापालट करण्याचे स्वप्न भंगले अाहे. हनुमानवाडी येथे हरित क्षेत्र विकास याेजना करण्याबाबतही अजून अंधारच अाहे. याउलट गाेदावरी संवर्धनाच्या नावाखाली पाचशे काेटींचा बार उडवण्याची तयारी सुरू अाहे. मुळात गाेदावरी प्रदूषण राेखून साैंदर्यीकरणासाठी यापूर्वी काेट्यवधी खर्चून पुरामुळे पाण्यात गेले अाहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खासगीकरणातील गाेदापार्कही महापुरात वाहून गेला अाहे. त्यानंतर गाेदा प्राेजेक्टच्या नावाखाली निधी खर्चाची स्मार्ट चाल अाता मुंढे यांच्या रडारवर असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या पहिल्याच बैठकीत मुंढंनी प्रकल्पाची गरज, तांत्रिक पूर्तता, व्यवहार्यता व मुख्य म्हणजे तरतूद या त्रिसूत्रीचा निकष लागू करण्याच्या सूचना दिल्या. 


स्मार्ट प्रकल्पांचे मुंढे यांना दर्शन 
केंद्राच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांच्या माहितीचे सादरीकरण अायुक्तांसमाेर करण्यात अाले. या अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, नेहरू उद्यानाचा पुनर्विकास, अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका स्मार्ट रोड, पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणेसाठी 'स्काडा' प्रणाली, सीसीटीव्ही, कमांड ॲण्ड कंट्रोल सिस्टिम, गावठाण भागात रस्ते विकास आदी प्रकल्पांची माहिती घेतली. अाढाव्यानंतर यातील किती प्रकल्प शहरासाठी खराेखरच अावश्यक याबाबत विचारणा कली. वर्ल्ड इकॉनॉमी फोरमने निर्देशित केल्यानुसार प्रकल्प अंमलबजावणीच्या २० आदर्श प्रक्रिया काय आहेत, तसेच शहराच्या वाहतूक नियोजनासाठी अन्य शहरांचे वाहनतळ धाेरण कसे याचा अभ्यास करण्याच्या सूचनादेखील मुंढे यांनी यावेळी दिल्या. 


शहरातील स्मार्ट राेड लागणार मार्गी 
अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकादरम्यान स्मार्ट राेड विकसनाला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. शासनाच्या नियमांनुसार पहिल्या तीन निविदाप्रक्रियेत किमान तीन ठेकेदारांचा सहभाग अपेक्षित अाहे. पहिल्या निविदेत प्रतिसाद न मिळाल्यामुळे दुसऱ्यांदा राबविलेल्या निविदाप्रक्रियेत मात्र तीन ठेकेदारांनी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्मार्ट राेड मार्गी लागण्याची शक्यता अाहे. 

बातम्या आणखी आहेत...