आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभेत 'मी नाशिककरांचा' एल्गार, घरपट्टीच्या जिझिया कराला स्थगिती; मुंढेंना दणका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील इंच न‌् इंच जमिनीला चार ते सातपट घरपट्टीतील करवाढ लादण्याच्या निर्णयाविराेधात महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी 'मी नाशिककर' या झेंड्याखाली एल्गार पुकारत महापाैर रंजना भानसी यांना करवाढीला स्थगिती देण्यास भाग पाडले. मुळात, करवाढीची प्रक्रियाच बेकायदेशीर असल्यामुळे किंबहुना त्यातून लाेकांचे नुकसान टळावे असा सर्वपक्षीयांचाच उद्देश असल्यामुळे अशा स्थगितीतून अाचारसंहितेचा भंग ठरणार नाही असेही नगरसेवकांनी निक्षून सांगितले. महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांच्यासाठी हा तिसरा माेठा धक्का असून, त्यांचे तिन्ही प्रतिष्ठेचे विषय सभागृहाने एकजुटीने हाणून पाडले अाहे. एकीकडे महासभेत करवाढीवर राळ उठलेली असताना दुसरीकडे महापालिकेबाहेर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्यासह राजकीय पक्षांनी एकत्र येत तब्बल सहा तास धरणे अांदाेलन केले.

 
महापाैर रंजना भानसी यांच्या अध्यतेखाली शहरातील करवाढीसंदर्भात नगरसेवकांची मत-मतांतरे जाणून घेण्यासाठी महासभा अायाेजित करण्यात अाली हाेती. या महासभेत पक्षीय जाेडे बाजूला ठेवून नगरसेवक 'मी नाशिककर' या झेंड्याखाली एकत्र अाले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विषयाला हात घालत यापूर्वीचे अायुक्त अभ्यासू नव्हते का, त्यांनी बरी शहरातील इंच न‌् इंच जमिनीला करवाढ केली नाही असा थेट हल्ला चढवला. करवाढीमुळे नाशिककर हाेरपळले असून जनतेचा अंत बघू नका असेही सुनावले. यापूर्वी विकास अाराखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनीवर घाला घालण्याविराेधात जनअांदाेलन उभे राहिले हाेते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांना वादग्रस्त अाराखडा रद्द करण्याची वेळ अाली. 


अाताही करवाढ रद्द झाली नाही तर लाेकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही व त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिला. विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांनी इंग्रजांना लाजवेल अशी करवाढ केल्याचा अाराेप करीत 'देश में रहना हाे ताे तीन गुना लगान देना पडेगा' या इंग्रजांच्या काळातील दडपशाहीची अाठवण येत असल्याचा टाेला लगावला. येथे तीन नव्हे चार गुना करवाढ लादली अाहे. महासभा, स्थायी समितीला विचारात घेतले नाही. मुळात सत्ताधाऱ्यांचाच प्रशासनावर अंकुश नसल्याचे यातून लक्षात येते. इंच न् इंच जमिनीवर कर लादण्यासाठी काय माेगलाई लागून गेली काय? असा सवाल करीत शहराला उद्ध्वस्त करण्याचे षङयंत्र असल्याचा अाराेप केला. उत्पन्नाचे नवनवीन स्त्राेत शाेधण्यात हुशारी दाखवा, कर तर काेणीही लादू शकते व वाढू शकते असाही चिमटा घेतला. अशा करवाढीमुळे भीक मागाे अांदाेलन करावे लागेल असे सांगताना भीक मागूनही कर भरण्याइतकी रक्कम मिळणार नाही असाही टाेमणा हाणला. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला असून हिरवा व पिवळा पट्टा हा भेदभाव कशासाठी, अाजघडीला शहरातील उद्याेग बाहेर जात असून माॅल्स, डाॅक्टर, दुकाने, उद्याेग अशा प्रत्येकाला वेगवेगळी करवाढ लागू करण्यामागे नेमके लाॅजिक काय? असाही सवाल केला. 


करवाढीचा निषेध; भाजपवरही कुरघाेडी 
करवाढ रद्द झालीच पाहिजे, अायुक्त मुंढे हाय हाय, मुंढे गाे बॅक, भारतीय गाजर पार्टीचा धिक्कार असाे अशा घाेषणा देत महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी 'मी नाशिककर' नावाने अांदाेलन उभे केले. यावेळी भजनी मंडळाने अापल्या शैलीत अायुक्तांसह करवाढीचा निषेध केला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधी भवनासमाेर व्हाॅलीबाॅल खेळत मैदानांवरील कर रद्द करण्याची मागणी केली. विराेधी पक्षांनी या अांदाेलनाचा राजकीय फायदा 'भारतीय गाजर पार्टीचा धिक्कार असाे' अशा घाेषणा देत भाजपवरही कुरघाेडी केली. 


निवडणूक आयोगाकडे जाणार 
प्रभाग क्रमांक १३ मधील 'क' जागेसाठी पाेटनिवडणुकीची अाचारसंहिता सुरू असताना १ एप्रिलपासून करवाढ करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केल्यामुळे अादर्श अाचारसंहितेचा प्रशासनानेच भंग केला. या करवाढीमुळे भाजपबराेबरच शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. मतदारांवर प्रभाव पाडणारा करवाढीचा निर्णय अाचारसंहिता भंग करणार असल्याची तक्रार सुधाकर बडगुजर यांनी केल्यानंतर संपूर्ण सभागृहाने त्यास अनुमाेदन दिले. अाचारसंहितेचा भंग झाल्याबाबत सर्वच नगरसेवक तक्रारी करू लागल्यावर मग महापाैर रंजना भानसी यांनी त्याची दखल घेत अापल्या अादेशात राज्य निवडणूक अायाेगाकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार करण्यासाठी महासभेचे इतिवृत्त तातडीने नगरसचिव विभागामार्फत पाठवावे असे अादेश दिले. त्यात अाचारसंहितेचा कसा भंग झाला याचाही स्पष्ट उल्लेख करण्याचे अादेश दिल्यामुळे अायुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची अडचण वाढणार अाहे. 


पालकमंत्र्यांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार 
करवाढीविराेधात सर्वपक्षीय मंडळी व नागरिक रस्त्यावर उतरून करीत असलेल्या अांदोलनाची दखल घेत तत्काळ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. शहरातील मनपा पदाधिकाऱ्यांनीही करवाढीविराेधात ठाेस भूमिका घेतल्याने यावर निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री लवकरच नाशकात येणार अाहेत. तरीही ताेडगा निघत नसल्यास या मुद्यावर थेट मुख्यमंत्र्यांशी बाेलून या निर्णयावर मार्ग काढला जाईल. 
- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप 

बातम्या आणखी आहेत...