आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन साेनाेग्राफी केंद्रांत संशयास्पद चाचण्या, महापालिकेची कारणे दाखवा नाेटीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गर्भलिंग निदान करणाऱ्यांचा शाेध घेण्यासाठी शहरातील सोनोग्राफी तसेच गर्भपात केंद्रांच्या तपासणीत संशयास्पदरित्या अाढळलेल्या दाेन केंद्रांना वैद्यकीय विभागाने नाेटिसा बजावल्या अाहेत. आतापर्यंत २६८ पैकी १४२ सोनोग्राफी केंद्रांची तर १२३ पैकी ४८ गर्भपात केंद्रांची तपासणी झाली अाहे. 

 

महापालिका क्षेत्रात गर्भलिंग निदान चाचण्यांचा सुळसुळाट झाल्याचे काही प्रकरणातून उघडकीस अाले हाेते. जिल्हा शासकीय रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याचे प्रकरण 'दिव्य मराठी'ने उघडकीस अाल्यानंतर याप्रकरणी मुख्य स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. वर्षा लहाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. सहा महिन्यांपूर्वीच सातपूरमध्ये एका इनोव्हा कारमध्ये गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जात असल्याचे उघड झाले हाेते. दरम्यान, महापालिका क्षेत्रात एकूण २६८ सोनोग्राफी केंद्रे आहेत. तर १२३ गर्भलिंगनिदान केंद्रे असून त्यांची तपासणी सुरू झाली आहे. त्यात, दोन सोनोग्राफी केंद्रामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...