आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरच्या डोंगरात खोदले वृक्षाराेपणासाठी ५ हजार खड्डे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - प्रशासनाच्या साथीला सामाजिक संस्था आल्या तर काय घडू शकते याचे उदाहरण त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगांमध्ये पहायला मिळत आहे. नैसर्गिक वनसंपदा पुन्हा निर्माण व्हावी, भूजल पातळी वाढावी अाणि पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नमामि गोदा फाऊंडेशन अाणि विविध   सामाजिक संस्थांच्या मदतीने ब्रम्हगिरी डोंगरावर वृक्षाराेपणासाठी ५ हजार खड्डे खोदले असून सर्वांचाच या उपक्रमात मोठा सहभाग लाभत आहे. 

 

जलपुरुष डाॅ. राजेंद्र सिंह व माजी न्यायाधीश अंबादास जोशी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून त्रंबकेश्वर नगरपरिषद व नमामि गोदा फाऊंडेशन यांनी या उपक्रमाला ब्रम्हगिरी पर्वतावर प्रारंभ केला अाहे. दररोज एका व्यक्तीने एक खड्डा खाेदण्यासाठी श्रमदान करायचे, असे ठरवून आतापर्यंत तब्बल ५ हजाराहून अधिक खड्डे खोदण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, 'नमामि गोदा'चे अध्यक्ष राजेश पंडित, समीर पाटणकर, अमोल दोंदे, रोहन देशपांडे, रोहित कुलकर्णी, मुख्याधिकारी डॉ. चेतना केकुरे, उदय सोनवणे, रवी जन्नावार यांनी या उपक्रमाला सुरवात केली. यात सामाजिक संस्था, तरुण यांची श्रमदान करण्यासाठी संख्या वाढत असून दररोज एक व्यक्ती या ठिकाणी एक खड्डा खोदायला येत अाहे. त्यामुळे ब्रह्मगिरीच्या संपूर्ण डोंगर खड्ड्यांनी फुलून गेल्याचे दिसत आहे. या उपक्रमाला अभियंता रमेश कांगणे, हरिष चित्ते, पंकज शिंपी, हिरामण ठाकरे, संजय पेखळे, संजय मिसर, चंदक्रांत काळे, प्रशांत गंगापुत्र, संजय लगड, भाऊसाहेब फुलमाळी, सुभाष शेळके, अरुण गरुड, सचिन महाजन, प्रशांत शिरुडे, मानस जोशी, स्वप्नील ठोंबरे, महेश महाजन, स्वप्नील जाधव, रोशन पाटील, दिनेश रौंदळ, सचिन मंडलिक, संकेत घैसास, गजानन घैसास आदींचे सहकार्य लाभत आहे. सिनेकलाकार चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव, धनश्री क्षीरसागर यांच्यासह डाॅ. मुग्धा सापडनीकर, प्रज्ञा पाटील, गणेश कदम यांनी उपक्रमात सहभाग नाेंदवला असून नाशिककरांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे अावाहन त्यांनी केले अाहे. 


उपक्रमातून सामाजिक संदेश 
या उपक्रमातून पर्यावरण प्रदूषण रोखणे, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकबंदी, पाणी बचत, प्रदूषण मुक्त गोदावरी, नासर्डीची नंदिनी असे अनेक सामाजिक संदेश दिले जात आहेत. ही जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर नागरिकांचीही आहे, असे सांगून समाजाचे निसर्गाशी नाते जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे राजेश पंडित यांनी सांगितले. 
वृक्षराजीने डाेंगरमाथा फुलावा तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी त्रंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर ५ हजाराहून अधिक खड्डे खोदण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपरिषद व नमामि गोदा फाऊंडेशन यांच्या संयुक्त श्रमदानातून हा उपक्रम राबविला जात अाहे. 


या संस्थांचा सहभाग 
नमामि गोदा, आय. पी. एल. ग्रुप, नाशिकची आई - गोदामाई, बाॅर्न टू हेल्प फाऊंडेशन, सांस्कृतिक कला मंडळ (नवीन नाशिक), बिनधास्त फ्रेन्ड ग्रुप, सोनवणे क्लासेस, क्लासिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, जनस्थान आदी. 
 

बातम्या आणखी आहेत...