आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित वस्तीची कामे राेखत अायुक्त मुंढेंकडून नगरसेवकांपाठाेपाठ भाजप अामदारांना धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मागील कामांचे दायित्व अधिक असल्याचे कारण देत व गरज, तांत्रिक याेग्यता व तरतूद या त्रिसूत्रीत न बसणाऱ्या ३२ कामांना एका फटक्यात अायुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेतून कात्री लावल्यानंतर त्यातून सर्वात माेठा धक्का भाजपचे शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनाच बसला अाहे. विशेष म्हणजे, सानप यांनी शासनाकडून दलित वस्ती याेजनेचा जवळपास सात काेटींचा निधी अाणला असून, त्याला काही प्रमाणात महापालिकेची जाेड अावश्यक असल्यामुळे संबंधित प्रस्ताव महासभेत हाेता. पालिका निधीला ब्रेक लावून राज्य शासनाच्या निधीतीलच कामाला लाल कंदील मिळाल्यामुळे भाजप अामदारासह नगरसेवकही निराश झाले असून, त्यातून मुंढे यांच्याविराेधात असंताेष भडकण्याची शक्यता अाहे. 


कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंढे यांनी अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अस्वस्थ झाले हाेते. मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अापल्या त्रिसूत्रीत बसणारी अाणि पालिकेला अार्थिक शिस्त लावणारीच कामे हाेतील, असे स्पष्ट केले हाेते. त्यामुळे तरतूद नसताना जादा विषयात नियमबाह्य प्रस्ताव ठेवणाऱ्या सत्ताधाऱ्यांची अडचण झाली हाेती. मुंढे यांच्या पारदर्शक कामकाजाला काेणाची तूर्तास नकारघंटा नसली तरी, जे काम नियमात अाहे किंबहुना त्यास शासनाकडून निधीही मिळाला अाहे त्यास ब्रेक लावण्याची बाब सत्ताधाऱ्यांना चांगलीच खटकली अाहे. 


जादा दराची निविदा असल्यामुळे काम थांबवले 
कोणत्याही कामाला थांबवले नसून संबंधित दलित वस्ती योजनेमधील कामाबाबत जादा दराची निविदा असल्यामुळे तडजोड करण्याबाबत संबंधित खातेप्रमुखांना सूचना केल्या आहेत. महापालिकेच्या दृष्टिकोनामधून प्रक्रिया सुरू असून सर्वांची कामे नियमानुसार होतील.

- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका 

बातम्या आणखी आहेत...